किल्ले सिंहगड
किल्ले सिंहगड(कोंढाणा) भाग :-१ _____एका अज्ञात कालखंडात गंगा यमुनेच्या तीरी 'कौंडिण्य' नावाचे रुषींच्या आश्रमातील कौंडिण्य रुषिंच्या शिष्यवरांचा १२ वर्षाचा कालखंड संपला.त्यांचा दिक्षांत समारंभ विधी झाला.गेले बारा वर्षे अध्ययनार्थ आलेल्या त्या शिष्यवरांपैकी जे राजगृहातील होते,ते आपापल्या राजियातील राजगृही गेले.जे राजाश्रित होते ते,आपापल्या राजकिय सेवा कार्यार्थ राज्यांत गेले,जे नगरवासी होते ते आपापल्या नगरांत कर्माधिन होण्यासाठी गृहस्थाश्रम स्विकारण्यास निघाले.पण,त्यातील काही शिषोत्तमांनी आपल्या गुरुवत अमरण अध्यापनाचे व्रत स्विकारले व आपल्या गुरुंच्या ज्ञानप्रसरनार्थ अष्ट दिशांस निघाले. _____त्यातील काही जणांचा एक जथा,अगस्ती मुनी मार्ग संशोधित दक्षिण देशी निघाला.त्यांचे ब्रिदवाक्य होते. "तमसो मा ज्योतिर्गमय!असते मा सदगमय!अमृतं मा गमय!" दिसा मासांनी काळ मागे टाकत आणि पाऊलापाऊली रस्ता मागे टाकीत तो विद्याविभूषित शिष्यांचा जथा महाराष्ट्र देशी दंडकारण्यात शिरला.आजवर आश्रमातील पाळीव प्राणि त्यांना पाहुन लालचावत होते.पण,आता दंडकारण्यातील प्राणि त्यांना पाहुन डरकाळत होते.साक...