पोस्ट्स

शूर्पारक अष्टागर

इमेज
______दमणगंगेपासून मुंबईपर्यंतच्या प्रदेशाला 'शूर्पारक' आणि शुर्पारकाच्या दक्षिणेकडील कुण्डलिकेपर्यंतच्या प्रदेशाला 'अष्टागर' अशी नावे होती.शूर्पारक हे नाव प्राचिन तर अष्टागर हे नाव अर्वाचिन आहे.शूर्पारक म्हणजे हल्लीचे 'सोपारा'.हे या प्रदेशाचे नाव होते व त्यांतील मुख्य ठाण्याचेही.भोवतालच्या खाड्या उथळ झाल्याने हल्ली त्याला फारसे महत्व उरलेले नाही.त्यामुळे त्याचा सामावेश आता 'वसईंत'करण्यात आलेला आहे.यद्नकुंडातून निघालेल्या सुपाच्या सहाय्याने परशुरामाने हि भूमी निर्माण केली म्हणून या प्रदेशाला शूर्पारक-सोपारा हे नाव मिळालेले आहे,अशा दंतकथा आहेत.जेथे नारळी व पोफळीची झाडे दाट उगवतात अगर मीठ पिकवतात अशा स्थळांस 'आगर' म्हणतात.समुद्राच्या भारतीय कक्षेत असेलेल्या सखल,सपाट,कोरड्या व खार्या जमिनींत मीठ पिकतें आणि गोड्या पाण्याचा साठा मुबलक प्रमाणात असेल तेथे नारळी सुपारीची आगरें असतात. "अलिबाग,नागांव,थळ,चौल,सासवने,साखर,अक्षी व किहीम हा आठ प्रसिद्ध आगरें या भागांत आहेत." सलग आठ आगरे लगोलग आल्याने या भागांस आता 'अष्टागर' अशी संद...

संघर्ष-नवनाथ आहेर

______आपल्या देशाने कित्येक आक्रमकांना तोंड दिले.हा कालखंड काही थोडा नाही सहाव्या शतकापासून ते १९४७ पर्यंतचा शेकडो वर्षांचा हा कालखंड आहे.हा संघर्ष काही फक्त सत्तांचाच नव्हता त्यासोबतच तो संस्कृती व धर्माचा देखील संघर्ष होता.अलेक्झांडरच्या आक्रमणाने साधारणपणे या परकीय संघर्षाची सुरुवात झाली.तो विविध देशांना चिरडत अगदी तक्षशिलेपर्यंत येऊन पोहोचला तेथील राजा अंभीबरोबर करार करुन तक्षशिलादेखील ताब्यात घेतली. अनेक छोटी राज्ये तसेच संस्थांनांवर त्याने आपला अंम्मल बसविला.याच कालखंडात आचार्य चाणक्यांच्या हुशारीने मौर्य साम्राज्य स्थापन झाले व या साम्राज्याने बराचसा भाग आपल्या अधिपत्याखाली आणला.        पहिले अरब आक्रमण झाले ते इ.स.६३६ मध्ये मोहम्मद बिन कासिम याचे.त्याने पुन्हा इ.स.७११ मध्ये आक्रमण करुन दाहिर राजाचा पराभव केला व अरबांना हिंदूस्थानात येण्याची जणू वाटच मोकळी करुन दिली.याच्या सैन्याने हिंदूस्थानातील महिलांवर प्रचंड अत्याचार केले.काही महिला पळवून नेल्या,प्रचंड लुटलूट केली.यावेळी राजा बाप्पा रावल यांनी अफगाणिस्थानापासून ते अरब पर्यंत अरबांना उखडून टाकले.पुढे जवळपास...

नाणेघाट लेख-जयंत कुलकर्णी

आपल्यापैकी अनेकजण नाणे घाटात मुक्काम टाकतात. दरीतून वरती येणारे ढग कवेत घेतात, शूद्ध हवा छातीत भरून घेतात आणि त्या गुहेतल्या पवित्र आणि गुढ अशा वातावरणात निस्तब्ध होतात. त्या गुहेच्या दारात उभे राहून मग आपण खालून रस्त्याने येणार्‍या व्यापारांचा काफिला नजरे समोर आणू लागतो. दमलेले, तहानलेले ते जीव हळू हळू वर येत असतात आणि वर आल्यावर विश्रांतीसाठी आपली पथारी सोडतात, जेवणाचे डबे उघडतात आणि थंड पाणी पिऊन तृप्त होतात. सुखदु:खाच्या दोन गोष्टी बोलून पुढच्या मार्गाक्रमणाबद्द्ल चर्चा करतात. जकात रांजणात टाकून पुढची वाट धरतात. तेवढ्यात गार वार्‍याच्या स्पर्शाने आपण भानावर येतो आणि गुहेत शिरतो. आपण त्या गुहेतल्या भिंतींवर असलेले लेखन बघून हे किती जूने आहे याबद्दल अचंबित होतो. मी जेव्हा लहानपणी, माझ्या आजोबांबरोबर (१९६५) या गुहेत मुक्काम ठोकला होता, तेव्हा या गुहेतल्या मूर्तीसुद्धा शाबूत होत्या. आपल्यातीलच कोणीतरी मग हळूच माहिती पुरवतो “ हे सातवाहन काळातील आहे” म्हणजे हे खूपच जुने आहे एवढेच आपल्याला समजते पण हे काय लिहीले आहे, याचे महत्व काय, हे आपल्याला ना त्यावेळी कोणी सांगू शकत आणि ना आपण त्याच्...

दुर्गपती

"सह्याद्री म्हणजे एक अनमोल अलंकार व या अलंकारातील एक अस कोंदण ज्याच्या असण्याने संपुर्ण अलंकाराची शोभा वाढावी तो म्हणजे रायगड.याच रायरीच्या पर्वतावर छत्रपती शिवरायांनी अखेरचा श्वास घेतला.महाराज शरीराने अस्त पावले मात्र त्यांच्या विचारांचा वारसा ते आपल्याला एखाद्या संजीवनीप्रमाणे मागे सोडून गेले.उभी हयात खुद्द कळीकाळावर मात करत स्वराज्य निर्माण करत्यांस केवळ शब्दांत बांधणे हे सर्वात कठीणतम काम होय.किल्ले साल्हेर ते किल्ले जिंजीपावेत सबंध दुर्गांची शृंखला याची साक्ष देतेय ते सांगतायेत आपल्याला त्यांच्या पराक्रमाचे तेज..... ते ऐकण्यासाठी आपण येथे आलोच पाहिजेत.शांत चित्ताने पराक्रमांचा वारसा सांगणार्या या रणमर्दांच्या चरणधूळीला भंडारा समजून भाळी ल्यायलेच पाहिजे.         हि नुसती साधी सुधी चरणधूळ नाहीये.हे चंद्र सुर्य असे पर्यंत ज्यांच्या पराक्रमाची किर्ती अजरामर राहिल अशा महाराष्ट्र देशीचे स्वामी दुर्गपती शिवभूपतींची आहे.कित्येक सल्तनती आणि बारा टोपीकरांना उचकटवून फेकणार्या बुद्धी व पराक्रमाचा हा बेल भंडारा आहे...!" #दुर्गपती

भारतीय तलावांची परंपरा-नवनाथ आहेर

       *फावल्या वेळेतील आपल्या नागरी संस्कृतीची पाणि व्यावस्था या विषयाच्या काही टिपा..! *  ______एके काळची गोष्ट आहे,की आपला भारत हा एक वैभवशाली देश होता.हजारो वर्षापुर्वी येथे सोन्याचा धुर निघत होता, याची कित्येक उदाहरणे आपल्या इतिहासात आपल्याला पहावयास मिळतात.प्राचीन काळापासून भारताची संस्कृती ही कृषी संस्कृती आहे.पण,ज्या पाण्यामुळे व पाणि व्यावस्थांमुळे आपली मातृभूमी हि सुजलाम व सुफलाम झाली.त्याच पाणि नियोजनाचा लिखित इतिहास हा फारच कमी प्रमाणात लिहिला गेल्याचे आपल्या लक्षात येते.कोणत्या मुख्य कारणांमुळे या सामाजिक महत्व असलेल्या पाणि व्यावस्थांचे सुसुत्र पद्धतिने लिखाण केले गेले नाही हे कळायला मात्र काही मार्ग नाही.अगदी तुरळक इतिहासकारांचे या पाणि व्यावस्थेवर लक्ष गेले व त्यांनी यावर थोड्याफार प्रमाणात अभ्यास केल्याचा आपल्याला अढळतो.पण यातूनही ज्या इतिहासकार व विद्वानांनी पाणि व्यावस्थेवर अभ्यास करुन भाष्य केले त्या सर्वांचे आपल्यावर निस्सिम उपकार  आहेत हे आपण विसरता कामा नये. _______आपण जर इतिहासाचा बारकाईने अभ्यास केला व त्यातून जर पाणि व्यावस्था हा व...

अफजलखान वध प्रसंग-नवनाथ आहेर

कवी परमानंद गोविंद नेवासकर कृत श्री शिवभारतातील अफजलखान वध प्रसंग. ..! _________ये अलिंगन दे.असें बोलून त्याने(अफजलखानाने)त्यांची (शिवरायांची)मान डाव्या हातानें धरुन दुसर्या उजव्या हातानें त्यांच्या कुसींत कट्यार खुपसली.बाहुयुद्धनिपुण शिवाजीराजांनी लगेच त्याच्या (अफजलखानाच्या)हातातून(आपली)मान सोडवून घेऊन अत्यंत गंभीर ध्वनीनें दरी दुमदुमवून टाकली आणि गोंधळून न जातां आपले अंग किंचित आंकुचित करुन शिवाजीराजांनी  आपल्या कुसींत घुसणारी ती कट्यार स्वत: चुकविली.हा वार तुला करतो.तो घे; मला धर.असें म्हणतच सिंहासारखा स्वर,सिंहासारखी गति,सिंहासारखे शरीर,सिंहासारखी दृष्टी,सिंहासारखी मान असलेले व आपल्या दोनही हातानीं फिरविलेल्या नागव्या तरवारीनें शोभणारे ते धैर्यवान व कर्तृत्ववान शिवाजीराजे,त्या वैर्याचा सूड घेण्यास प्रवृत्त होऊन त्यांनी आपल्या तरवारीचे टोक त्याच्या (अफजलखानाच्या)पोटांतच खुपसले.त्यानीं (शिवरायांनी) शत्रूच्या पोटांत पाठीपर्यंत खुपसलेली ती तरवार  सर्व आंतडी ओढून काढली.शिवाजीराजांची तरवार अफजलखानास भेदून शोभूं लागली.असा पराक्रम शिवाजी महाराजांनी जेव्हां दाख...

किल्ले सुधागड स्थलदर्शन-नवनाथ आहेर

*किल्ले सुधागड भौगोलिक व स्थलदर्शनात्मक माहीती* किल्ले सुधागड भौगोलिक:-              व्यापार हा नेहमी सुरक्षित व सोईस्कर मार्गांच्या आणि संपन्न बाजार पेठांच्या शोधात असतो ही खुष्कीचे बहुतांशी मार्ग हे अनेक सत्ताधिशांच्या वाढत्या बलामुळे बंद झाल्याने हिंदुस्थानचा व्यापार हा सर्व पश्चिम सागर किनार्याकडे वळू लागला.पहिली सत्तेची केंद्रे हि जो पर्यंत उत्तरेत होती तो पर्यंत व्यापार हा गुजरातेतील भडोच बंदराच्या जवळ केंद्रित होऊन भडोच(भरुच) बंदराची भरभराट झाली.मात्र पुढे भारताच्या सत्तेचे केंद्र हे सातवाहनांनी दक्षिणपथांत स्थापन केले.त्यामुळे,अर्थातच व्यापार हा पश्चिम सागर किनार्याकडे लोटला गेला व सोपारा,कल्याण,चौल हि बंदरे भरभराटीस आली.चौलच्या उत्तरेस अंबा व दक्षिणेस कुंडलिका या नद्यांची उगमस्थाने आहेत.सोपार्याहून कल्याण मुरबाडमार्गे नाणें घाटांतून जुन्नर नाशिक पर्यंत आणि चौल पासून कोकण दरवाजामार्गे कार्ल्याहून तगर व पैठण पर्यंत व्यापारी वाहतूक सुरु झाली.           पुढे दक्षिणपथांत राजसत्ता काहीशी स्थिर स्थावर झाल्यावर व व्यापाराची के...