राजगडवरील ती स्मारकशिळा-नवनाथ आहेर
"हि तो नरविरांची मांदियाळी..!" "सदर फोटोत दिसतोय तो एक 'स्मारक शिळे'चा प्रकार आहे.आयताकार उभट प्रकारची शिळा व वरच्या बाजूस दिवा बत्तीची सोय,काही शिळांना मध्यभागी दिवा लावण्यासाठी कोनाडा असतो. तात्कालीन कालखंडात विरगळ सोबतच काही ठिकाणी अशाही स्मारक शिळा उभारल्या जायच्या.देव,देश,धर्मासाठी आपला देह त्यागणार्या विराच्या प्रती ती एक निष्ठा वाहण्याचा हा एक प्रयत्न होता अशीच एक स्मारक शिळा तुम्हाला रायगडस्थित शिर्काई देवीच्या नविन घरट्याच्या मागेही दिसेल अन्यही काही ठिकाणी अशा स्मारक शिळा मी पाहिल्या आहे. वरील फोटो हा राजगडाच्या सुवेळा माचीच्या सोपान मार्गाने बिनीच्या बुरुजाकडे जातानाचा आहे. सोबतचे गणेश शिल्प मात्र नविन वाटते आहे.पण,हा एक विरोधाभास आहे की ज्या शुर विरांच्या रक्ताने या भूमीला अभिषेक झाला तेव्हा आपले देव देव्हार्यात सुरक्षित राहिले.पण,दुर्दैव आम्ही भुमीपुत्र यांच्या त्यागाला विसरलो.गणेश शिल्पाला छान शेंदूर लावलेला आहे(हे ही चुकच आहे.कुठल्याही वास्तूला शेंदूर वा रंग लावणे हे पुरातत्व खात्याच्या नियमांच्या विरोधात आहे.तसेच असे केल्याने मुळ शिल्पाचे नुकसान ह...