पोस्ट्स

जानेवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संघर्ष-नवनाथ आहेर

______आपल्या देशाने कित्येक आक्रमकांना तोंड दिले.हा कालखंड काही थोडा नाही सहाव्या शतकापासून ते १९४७ पर्यंतचा शेकडो वर्षांचा हा कालखंड आहे.हा संघर्ष काही फक्त सत्तांचाच नव्हता त्यासोबतच तो संस्कृती व धर्माचा देखील संघर्ष होता.अलेक्झांडरच्या आक्रमणाने साधारणपणे या परकीय संघर्षाची सुरुवात झाली.तो विविध देशांना चिरडत अगदी तक्षशिलेपर्यंत येऊन पोहोचला तेथील राजा अंभीबरोबर करार करुन तक्षशिलादेखील ताब्यात घेतली. अनेक छोटी राज्ये तसेच संस्थांनांवर त्याने आपला अंम्मल बसविला.याच कालखंडात आचार्य चाणक्यांच्या हुशारीने मौर्य साम्राज्य स्थापन झाले व या साम्राज्याने बराचसा भाग आपल्या अधिपत्याखाली आणला.        पहिले अरब आक्रमण झाले ते इ.स.६३६ मध्ये मोहम्मद बिन कासिम याचे.त्याने पुन्हा इ.स.७११ मध्ये आक्रमण करुन दाहिर राजाचा पराभव केला व अरबांना हिंदूस्थानात येण्याची जणू वाटच मोकळी करुन दिली.याच्या सैन्याने हिंदूस्थानातील महिलांवर प्रचंड अत्याचार केले.काही महिला पळवून नेल्या,प्रचंड लुटलूट केली.यावेळी राजा बाप्पा रावल यांनी अफगाणिस्थानापासून ते अरब पर्यंत अरबांना उखडून टाकले.पुढे जवळपास...

नाणेघाट लेख-जयंत कुलकर्णी

आपल्यापैकी अनेकजण नाणे घाटात मुक्काम टाकतात. दरीतून वरती येणारे ढग कवेत घेतात, शूद्ध हवा छातीत भरून घेतात आणि त्या गुहेतल्या पवित्र आणि गुढ अशा वातावरणात निस्तब्ध होतात. त्या गुहेच्या दारात उभे राहून मग आपण खालून रस्त्याने येणार्‍या व्यापारांचा काफिला नजरे समोर आणू लागतो. दमलेले, तहानलेले ते जीव हळू हळू वर येत असतात आणि वर आल्यावर विश्रांतीसाठी आपली पथारी सोडतात, जेवणाचे डबे उघडतात आणि थंड पाणी पिऊन तृप्त होतात. सुखदु:खाच्या दोन गोष्टी बोलून पुढच्या मार्गाक्रमणाबद्द्ल चर्चा करतात. जकात रांजणात टाकून पुढची वाट धरतात. तेवढ्यात गार वार्‍याच्या स्पर्शाने आपण भानावर येतो आणि गुहेत शिरतो. आपण त्या गुहेतल्या भिंतींवर असलेले लेखन बघून हे किती जूने आहे याबद्दल अचंबित होतो. मी जेव्हा लहानपणी, माझ्या आजोबांबरोबर (१९६५) या गुहेत मुक्काम ठोकला होता, तेव्हा या गुहेतल्या मूर्तीसुद्धा शाबूत होत्या. आपल्यातीलच कोणीतरी मग हळूच माहिती पुरवतो “ हे सातवाहन काळातील आहे” म्हणजे हे खूपच जुने आहे एवढेच आपल्याला समजते पण हे काय लिहीले आहे, याचे महत्व काय, हे आपल्याला ना त्यावेळी कोणी सांगू शकत आणि ना आपण त्याच्...

दुर्गपती

"सह्याद्री म्हणजे एक अनमोल अलंकार व या अलंकारातील एक अस कोंदण ज्याच्या असण्याने संपुर्ण अलंकाराची शोभा वाढावी तो म्हणजे रायगड.याच रायरीच्या पर्वतावर छत्रपती शिवरायांनी अखेरचा श्वास घेतला.महाराज शरीराने अस्त पावले मात्र त्यांच्या विचारांचा वारसा ते आपल्याला एखाद्या संजीवनीप्रमाणे मागे सोडून गेले.उभी हयात खुद्द कळीकाळावर मात करत स्वराज्य निर्माण करत्यांस केवळ शब्दांत बांधणे हे सर्वात कठीणतम काम होय.किल्ले साल्हेर ते किल्ले जिंजीपावेत सबंध दुर्गांची शृंखला याची साक्ष देतेय ते सांगतायेत आपल्याला त्यांच्या पराक्रमाचे तेज..... ते ऐकण्यासाठी आपण येथे आलोच पाहिजेत.शांत चित्ताने पराक्रमांचा वारसा सांगणार्या या रणमर्दांच्या चरणधूळीला भंडारा समजून भाळी ल्यायलेच पाहिजे.         हि नुसती साधी सुधी चरणधूळ नाहीये.हे चंद्र सुर्य असे पर्यंत ज्यांच्या पराक्रमाची किर्ती अजरामर राहिल अशा महाराष्ट्र देशीचे स्वामी दुर्गपती शिवभूपतींची आहे.कित्येक सल्तनती आणि बारा टोपीकरांना उचकटवून फेकणार्या बुद्धी व पराक्रमाचा हा बेल भंडारा आहे...!" #दुर्गपती

भारतीय तलावांची परंपरा-नवनाथ आहेर

       *फावल्या वेळेतील आपल्या नागरी संस्कृतीची पाणि व्यावस्था या विषयाच्या काही टिपा..! *  ______एके काळची गोष्ट आहे,की आपला भारत हा एक वैभवशाली देश होता.हजारो वर्षापुर्वी येथे सोन्याचा धुर निघत होता, याची कित्येक उदाहरणे आपल्या इतिहासात आपल्याला पहावयास मिळतात.प्राचीन काळापासून भारताची संस्कृती ही कृषी संस्कृती आहे.पण,ज्या पाण्यामुळे व पाणि व्यावस्थांमुळे आपली मातृभूमी हि सुजलाम व सुफलाम झाली.त्याच पाणि नियोजनाचा लिखित इतिहास हा फारच कमी प्रमाणात लिहिला गेल्याचे आपल्या लक्षात येते.कोणत्या मुख्य कारणांमुळे या सामाजिक महत्व असलेल्या पाणि व्यावस्थांचे सुसुत्र पद्धतिने लिखाण केले गेले नाही हे कळायला मात्र काही मार्ग नाही.अगदी तुरळक इतिहासकारांचे या पाणि व्यावस्थेवर लक्ष गेले व त्यांनी यावर थोड्याफार प्रमाणात अभ्यास केल्याचा आपल्याला अढळतो.पण यातूनही ज्या इतिहासकार व विद्वानांनी पाणि व्यावस्थेवर अभ्यास करुन भाष्य केले त्या सर्वांचे आपल्यावर निस्सिम उपकार  आहेत हे आपण विसरता कामा नये. _______आपण जर इतिहासाचा बारकाईने अभ्यास केला व त्यातून जर पाणि व्यावस्था हा व...

अफजलखान वध प्रसंग-नवनाथ आहेर

कवी परमानंद गोविंद नेवासकर कृत श्री शिवभारतातील अफजलखान वध प्रसंग. ..! _________ये अलिंगन दे.असें बोलून त्याने(अफजलखानाने)त्यांची (शिवरायांची)मान डाव्या हातानें धरुन दुसर्या उजव्या हातानें त्यांच्या कुसींत कट्यार खुपसली.बाहुयुद्धनिपुण शिवाजीराजांनी लगेच त्याच्या (अफजलखानाच्या)हातातून(आपली)मान सोडवून घेऊन अत्यंत गंभीर ध्वनीनें दरी दुमदुमवून टाकली आणि गोंधळून न जातां आपले अंग किंचित आंकुचित करुन शिवाजीराजांनी  आपल्या कुसींत घुसणारी ती कट्यार स्वत: चुकविली.हा वार तुला करतो.तो घे; मला धर.असें म्हणतच सिंहासारखा स्वर,सिंहासारखी गति,सिंहासारखे शरीर,सिंहासारखी दृष्टी,सिंहासारखी मान असलेले व आपल्या दोनही हातानीं फिरविलेल्या नागव्या तरवारीनें शोभणारे ते धैर्यवान व कर्तृत्ववान शिवाजीराजे,त्या वैर्याचा सूड घेण्यास प्रवृत्त होऊन त्यांनी आपल्या तरवारीचे टोक त्याच्या (अफजलखानाच्या)पोटांतच खुपसले.त्यानीं (शिवरायांनी) शत्रूच्या पोटांत पाठीपर्यंत खुपसलेली ती तरवार  सर्व आंतडी ओढून काढली.शिवाजीराजांची तरवार अफजलखानास भेदून शोभूं लागली.असा पराक्रम शिवाजी महाराजांनी जेव्हां दाख...

किल्ले सुधागड स्थलदर्शन-नवनाथ आहेर

*किल्ले सुधागड भौगोलिक व स्थलदर्शनात्मक माहीती* किल्ले सुधागड भौगोलिक:-              व्यापार हा नेहमी सुरक्षित व सोईस्कर मार्गांच्या आणि संपन्न बाजार पेठांच्या शोधात असतो ही खुष्कीचे बहुतांशी मार्ग हे अनेक सत्ताधिशांच्या वाढत्या बलामुळे बंद झाल्याने हिंदुस्थानचा व्यापार हा सर्व पश्चिम सागर किनार्याकडे वळू लागला.पहिली सत्तेची केंद्रे हि जो पर्यंत उत्तरेत होती तो पर्यंत व्यापार हा गुजरातेतील भडोच बंदराच्या जवळ केंद्रित होऊन भडोच(भरुच) बंदराची भरभराट झाली.मात्र पुढे भारताच्या सत्तेचे केंद्र हे सातवाहनांनी दक्षिणपथांत स्थापन केले.त्यामुळे,अर्थातच व्यापार हा पश्चिम सागर किनार्याकडे लोटला गेला व सोपारा,कल्याण,चौल हि बंदरे भरभराटीस आली.चौलच्या उत्तरेस अंबा व दक्षिणेस कुंडलिका या नद्यांची उगमस्थाने आहेत.सोपार्याहून कल्याण मुरबाडमार्गे नाणें घाटांतून जुन्नर नाशिक पर्यंत आणि चौल पासून कोकण दरवाजामार्गे कार्ल्याहून तगर व पैठण पर्यंत व्यापारी वाहतूक सुरु झाली.           पुढे दक्षिणपथांत राजसत्ता काहीशी स्थिर स्थावर झाल्यावर व व्यापाराची के...

पितळखोरा लेणी-नवनाथ आहेर

"पितळखोरे लेणी...!" "राकट देशा कणखर देशा,          दगडांच्या देशा...!"         या ओळी खर्या अर्थाने महराष्ट्राला भूषावहच आहेत असे म्हणण्यास हरकत नाही.आपल्या सह्याद्रीतील माणसे जशी वरुन काटक कणखर तेवढीच मनाने मायाळू,त्याच प्रमाणे सह्याद्रीतील दगडही वरुन कणखर पण आतून तितकाच मृदू. आपल्या सह्याद्रीचा गाभा हा कणखर व विशेष म्हणजे एकसंधी आहे.त्यामुळे छन्नी व हातोड्यांनी खोदकाम करण्यास अनुकूल आहे.भारतामध्ये लेणी खोदण्याची प्रथा सुरु झाली त्या काळात व जो पर्यंत हि प्रथा आपल्याकडे सुरु होती तो पर्यंत अनेक सत्ता या ठिकाणी आपले राज्य गाजवून गेल्या.मात्र जोपर्यंत लेण्या खोदल्या जात होत्या त्या काळांत या सत्ता खर्या अर्थाने प्रबळ होत्या,त्यांच्या स्वातंत्र्यलक्ष्मी अबादीत होती,त्यांच्या राज्यात आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक संपन्नता नांदत होती.हे लेण्या जो पर्यंत खोदल्या जात होत्या तो पर्यंत वरील सर्व बाबी राज्यात होत्या याचे 'लेण्या' हे सर्वात मोठे व जिते जागते उदाहरण होय.लेण्यांमुळे सुबत्ता होती असे नव्हे मात्र हे असे खोदकाम एका स्थिरस्थावर व ऐश्वर्यसंपन्...

लेणी-स.आ.जोगळकर८

______सह्याद्रीत असंख्य लेणी आहेत.काहींची पडझड झालेली आहे, काही अर्धवट सोडून दिलेली आहेत. काही केवळ खडकाच्या अंतर्भागाची चाचपणी करण्यासाठी खोदलेली आहेत.खर तर नुसत्या लेण्या हा एकच विषय घेतला तर अर्धा जन्म पुरणार नाही इतका सुक्ष्म अभ्यास आहे.अशाच या महाराष्ट्रातील लेणी समुहातील हि 'कार्ले' लेणी 'आई एकवीरा' देवीचे स्थान म्हणून हे आपल्या देशी सर्वांना माहीती आहेच.लोणावळे गटांत एकूण मुख्य चार लेण्या कोंडाणे,भाजें,बेडसें,कार्ले. पैकी कोंडाणे व भाजें लेण्यांचे काळानुसार स्थान पहिले.        प्रस्थर(दगडी) स्तंभांची प्रथा आपल्याकडेच काय अगदी सगळीकडेच जुनी आहे.असीरिया व बाबीलोन या देशांत अशा स्तंभांची पूजा करण्यात येत असे.ग्रीस देशांत त्यांवर धर्माज्ञा खोदण्यांत येत असत.सम्राट अशोकाने आपल्या साम्राज्याच्या मूल प्रदेशांत व पवित्र क्षेत्रे दर्शविण्यासाठी व विशेष महत्वाच्या स्तूपांसमोर सुमारे तीस प्रचण्ड एकसंधी प्रस्तर स्तंभ उभारले.सिंह,हत्ती किंवा त्यांच्या चौकडा, त्यावर क्वचित धर्मचक्र,त्रिरत्न अशी धर्मिक प्रतीकें खोदलेले प्रस्तर त्यांच्या त्यांच्या अग्रांवर बसविलेले आहेत.सारना...

दक्षिण दिग्विजय शिवकालीन उल्लेख-नवनाथ आहेर

______शिवरायांच्या राजाभिषेकानंतरच्या दक्षिणदिग्विजयाच्या वेळीच्या या घटना आहेत.राजधानी रायगडपासून १२०० ते १५०० कि.मी. अंतरावर असणार्या जिंजी व परिसरांत मराठ्यांच्या पराक्रमाची पाऊले रजलेली आहेत.तेवेनापट्टम, वालदूर परतीच्या वाटेवर कोल्हारकोट,बाळपूरकोट,त्रिवादी कोट व कोलेेरुन नदीचा काठ आम्हा महाराष्ट्रातील पोरांना प्रेरणा देतो आहे...!  हजारो मैल अंतारावर कधी काळी उधळलेला  विजयाचा बेल भंडारा आम्हाला आमच्या पुर्वजांच्या अस्तित्वाची जाणिव करुन देत आहे...! म्हणून म्हणतो की वाचलंच पाहिजे...!  कागदं बोलतात...!  ______________________________ ________ इ.स.१६७७ जुलै ९ मार्टिन रोजनिशी (मार्टिन हा पाँडेचेरी येथील फ्रेंच वखारीचा मुख्य आधिकारी होता.याने लिहलेली हकीकत सर जदुनाथ सरकार यांनी इस. १९२४ मध्ये प्रसिद्ध केली. त्यातील काही भाग.)  तेवनापट्टम किल्ल्यांतील लोक भिऊन पळाल्यामुळे तेवेनापट्टम(कुडालोर) किल्ला मराठ्यांनी घेतला. पत्रसार संग्रह खंड-३ कागद क्रमांक-२७६७ ______________________________ ________ इ.स.१६७७ ऑगस्ट २ नेलोररामाण्णा To  ग लँघॉर्न(इंग्रज) From place- ...

सोनगड(गुजरात महाराष्ट्र बॉर्डर) - नवनाथ आहेर

*मराठ्याच्या पाऊलखुणा जपणारा सोनगड*      (नवापूर महाराष्ट्र गुजरात बॉर्डर,सोनगड)  ______महाराष्ट्रात सोनगड नावाचे मला माहीत असलेले ३ किल्ले  आहेत.एक म्हणजे सर्वांना माहित असलेला रायगडजवळील महाडच्या वाटेवरचा चांभारगडजवळील सोनगड, दुसरा सिन्नर ठाणगाव मार्गाजवळील सोनेवाडी गावाच्या बाजूला खंडोबाचे देवस्थान असलेला सोनगड व तिसरा म्हणजे गुजरात महाराष्ट्र बॉर्डरवरील नवापुर जवळील सोनगड.कामाच्या निमित्ताने महिन्यातून गुजरातला जाणे होतेच होते.नवापुर बॉर्डर क्रॉस केल्यावर थोडे पुढे गेले की सुरत कडे जाताना उजव्या रस्त्याला एका डोंगरावर भगवा झेंडा भडकताना दिसायचा.सह्याद्री भटकंतीचा अनुभव असल्याने लक्षात येत होते की येथे किल्ला आहे मात्र कोणता? किल्लाच आहे की एखादे मंदिर आहे हे मात्र माहीत नव्हते.मागिल वर्षी शिवजयंतीच्या काही दिवस अगोदर बडौद्याला निघालो असताना बॉर्डरजवळ मुक्काम करण्याची वेळ पडली.मग मात्र या सोनगड गावात जायचा योग आला.काही दिवसांनी शिवजयंती होती तिथे मुख्य रस्त्याच्या आत एक महाराजांचा पुतळा आहे तेथे शिवजयंतीची तयारी चालू होती.स्थानिकांना विचारले तेव्हा असे समजले ...

शिवराय पुण्यतिथी-नवनाथ आहेर

३ मार्च १६७० ________रायरीच्या पर्वतावर छत्रपती शिवरायांनी अखेरचा श्वास घेतला.महाराज शरीराने अस्त पावले मात्र त्यांच्या विचारांचा वारसा ते आपल्याला एखाद्या संजिवनीप्रमाणे मागे सोडून गेले.उभी हयात खुद्द कळीकाळावर मात करत स्वराज्य निर्माण करत्यांस केवळ शब्दांत बांधणे हे सर्वात कठीण काम होय.किल्ले साल्हेर ते किल्ले जिंजीपावेत सबंध दुर्गांची शृंखला याची साक्ष देतेय ते सांगतायेत आपल्याला त्यांच्या पराक्रमाचे तेज..... ते ऐकण्यासाठी आपण तेथे गेले पाहिजेत. 'एकवीरा भगवतीं गणेशं च सरस्वती|सदगुरुं च महासिद्धं सिद्धानामपि सिद्धिदम् | प्रणिपत्य प्रवक्ष्यामी महाराजस्थ धीमत:| चरितं शिवराजस्य भरतस्येव भारतम् ||२२|| -भगवती एकवीरा गणपती सरस्वती आणि सिद्धांना सुद्धा सिद्धिदाता महासिद्ध सदगुरु यांना प्रणिपात भरतवंशाच्या भारताप्रमाण असलेल् बुद्धिमान शिवाजी महाराजांचे चरित्र मी कथन करतो.        शिवभारतकार कविंद्र परमानंद शिवचरीत्राची सुरुवात करताना शिवरायांची तुलना हि भरताशी करतात.शिवभारत वाचत असताना कविने रचलेली कवने  डोक्यात मनात खोलवर रुजत जातात.कवी पुढे पुढे जसजसे शिवचरीत्र कथन क...