संघर्ष-नवनाथ आहेर
______आपल्या देशाने कित्येक आक्रमकांना तोंड दिले.हा कालखंड काही थोडा नाही सहाव्या शतकापासून ते १९४७ पर्यंतचा शेकडो वर्षांचा हा कालखंड आहे.हा संघर्ष काही फक्त सत्तांचाच नव्हता त्यासोबतच तो संस्कृती व धर्माचा देखील संघर्ष होता.अलेक्झांडरच्या आक्रमणाने साधारणपणे या परकीय संघर्षाची सुरुवात झाली.तो विविध देशांना चिरडत अगदी तक्षशिलेपर्यंत येऊन पोहोचला तेथील राजा अंभीबरोबर करार करुन तक्षशिलादेखील ताब्यात घेतली. अनेक छोटी राज्ये तसेच संस्थांनांवर त्याने आपला अंम्मल बसविला.याच कालखंडात आचार्य चाणक्यांच्या हुशारीने मौर्य साम्राज्य स्थापन झाले व या साम्राज्याने बराचसा भाग आपल्या अधिपत्याखाली आणला. पहिले अरब आक्रमण झाले ते इ.स.६३६ मध्ये मोहम्मद बिन कासिम याचे.त्याने पुन्हा इ.स.७११ मध्ये आक्रमण करुन दाहिर राजाचा पराभव केला व अरबांना हिंदूस्थानात येण्याची जणू वाटच मोकळी करुन दिली.याच्या सैन्याने हिंदूस्थानातील महिलांवर प्रचंड अत्याचार केले.काही महिला पळवून नेल्या,प्रचंड लुटलूट केली.यावेळी राजा बाप्पा रावल यांनी अफगाणिस्थानापासून ते अरब पर्यंत अरबांना उखडून टाकले.पुढे जवळपास...