अफजलखान वध प्रसंग-नवनाथ आहेर
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
कवी परमानंद गोविंद नेवासकर कृत श्री शिवभारतातील अफजलखान वध प्रसंग.
_________ये अलिंगन दे.असें बोलून त्याने(अफजलखानाने)त्यांची (शिवरायांची)मान डाव्या हातानें धरुन दुसर्या उजव्या हातानें त्यांच्या कुसींत कट्यार खुपसली.बाहुयुद्धनिपुण शिवाजीराजांनी लगेच त्याच्या (अफजलखानाच्या)हातातून(आपली)मान सोडवून घेऊन अत्यंत गंभीर ध्वनीनें दरी दुमदुमवून टाकली आणि गोंधळून न जातां आपले अंग किंचित आंकुचित करुन शिवाजीराजांनी आपल्या कुसींत घुसणारी ती कट्यार स्वत: चुकविली.हा वार तुला करतो.तो घे; मला धर.असें म्हणतच सिंहासारखा स्वर,सिंहासारखी गति,सिंहासारखे शरीर,सिंहासारखी दृष्टी,सिंहासारखी मान असलेले व आपल्या दोनही हातानीं फिरविलेल्या नागव्या तरवारीनें शोभणारे ते धैर्यवान व कर्तृत्ववान शिवाजीराजे,त्या वैर्याचा सूड घेण्यास प्रवृत्त होऊन त्यांनी आपल्या तरवारीचे टोक त्याच्या (अफजलखानाच्या)पोटांतच खुपसले.त्यानीं (शिवरायांनी) शत्रूच्या पोटांत पाठीपर्यंत खुपसलेली ती तरवार सर्व आंतडी ओढून काढली.शिवाजीराजांची तरवार अफजलखानास भेदून शोभूं लागली.असा पराक्रम शिवाजी महाराजांनी जेव्हां दाखविला,तेव्हा अफजलखानाचे डोकें गरगर फिरु लागून तो विव्हळू लागला.नंतर आपल्या रक्ताच्या धारानीं भूमी भिजवून,झिंगलेल्या माणसाप्रमाणें मूर्च्छेनें झोकांड्या खात खात अतिविव्हळत होत्साता तो खान शिवाजीराजांच्या शास्त्राघाताच्या योगानेें पोटांतून बाहेर पडलेली आंतडी जसींच्या तसींच आपल्या हातानें धरुन;ह्यांनी मला हेथें ठार केलें,ह्या शत्रूस वेगाने ठार करा.असे जो आपल्या पार्श्ववर्ती सेवकास म्हणतो,तोंच तो अभिमानी सेवक तीच अफजलखानाची तरवार उगारुन ठार मारण्याच्या इच्छेंने एकदम शिवाजीराजांवर चालून गेला.ब्राम्हणास शिवाजीराजे ठार मारणार नाहीत,असे जाणून धनी अफजलखानानें त्या ब्राम्हण योद्धयास युद्धांत निविष्ट केलें होते.तो ब्राम्हण आहे,असे, ऐकूण जाणत्या व नीतिनें वागणार्या शिवाजीराजांनी त्यास ठार मारण्याची इच्छा केली नाही.अफजलखानचे सैनिक तेथें पोचले नाहीत तोंच त्यांने ती तरवार शिवाजीराजांवर हाणली.त्यानें मारलेली तरवार त्या समयीं शिवाजीराजांनी आपल्या तरवारीने अडविली आणि पट्टयाने त्याच्या धन्याच्या खानाच्या डोक्याचेही दोन तुकडे केले.धिप्पाड शत्रूचें पट्टयाने कापलेले डोके,वज्राने फोडलेल्या पर्वत शिखरा प्रमाणे लगेच खालीं पडले.एकीकडे धड पसरले,एकीकडे आंतडी गळाली,एकीकडे मस्तक पडले,एकीकडे पटका पडला,छत्री एकीकडे उडाली,चवरीही एकीकडे गेली,सर्व प्रकारच्या मोत्यांचा व रत्नांचा तो शिरपेचही एकीकडे पडला,वस्र एकीकडे-असी दशा प्राप्त होऊन तो दुष्ट आपल्याच कर्मामुळें भूमीवर लोळला.त्याच्या त्या सैनिकांच्या डोळ्यांचे पाते लवते न लवते तोंच शिवाजीराजांनी त्या यवनास धाडकन खाली पाडलें.धन्यास ठार मारलेला पाहून,अबदुल सय्यद,बडा सय्यद,अफजलखानाचा पुतण्या उन्मत्त रहिमखान,अत्यंत मानी आणि वायूहून आधिक वेगवान,बलवान,विध्वंसक व अफजलखानाचे पृष्टरक्षक असे दुसरेही यवन असे ते यवनसेनेचे नायक अतिशय कृद्ध व बेफाम होऊन शस्त्रे परजीत शिवाजीराजांस ठार मारण्याच्या इच्छेंने सर्व मिळून त्यांच्यावर चालून गेले.त्या समयीं शस्त्रांची जोडी फिरवीत शिवाजीराजांनी आपल्या भोंवती जणूं दीर्घ तटच केला.त्यांनी त्या युद्धामध्ये न गोंधळता आकाशांत गरगर फिरत राहून स्पर्धा करणार्या शत्रूचे डोळे अहोरात्र फिरविलें.काळ्या तरवारीनें व तीक्ष्ण पटट्यांने त्यांनी दिग्वलयाप्रमाणें वलयें केली.तरवार आणि पट्टा वारंवार फिरवून वलयें बनविणार्या व मनांत गर्व वाहणार्या अस्या त्या उग्रकर्मी शिवाजीराजांस शत्रूकडील,तसेच स्वकीयही सैनिक त्या समयीं युद्धांत पाहूं शकले नाहीत.क्षणभर पृथ्वींच घुसत,क्षणभर आकाशांत शिरत,क्षणभर मध्ये राहात,ह्याप्रमाणे ते क्षणभरही स्तब्ध नव्हते.विद्युत्पाताप्रमाणें वेगानें आपल्यावर येणार्या अस्या विरुद्ध वीरांनी केलेेले अनेक खडगप्रहार त्या प्रभूंनी केव्हा पट्ट्यानेच,तर केव्हा, तरवारीनें आणि केंव्हा त्या दोहोनीं एकदम अडविले.तेव्हां शंभाजी कावजी,काताजी इंगळे,कोंडाजी व येसाजी हे दोघे कंक,कृष्णाजी गायकवाड,सूरजी काटके,त्याचप्रमाणे जिवा माहाला,विसाजी मुरुंबक,शंभाजी करवर,इभ्राइम सिद्दी अस्या त्या शिवराजरक्षक दहा महावीरांनी गर्जना करुन,म्यानांतून प्रचंड तरवारी उपसून,पर्वतांनी जसें वायूस आटवावें तसा त्यांना(खानाकडील सैनिकांस)तेथें विरोध केला.हे राजे ,तुमच्यावर हा तरवारीचा वार करतो,तो माझा वार सांभाळा!असे वारंवार म्हणत त्यावेळीं बडा सय्यद सिंहाप्रमाणे प्रचंड गर्जना करणार्या व अफजलखानास ठार मारणार्या शिवाजीराजांवर पुन: धावून गेला.वेगवान जिवा महालानें,(शिवाजाराजांनी)नको म्हटले असतांहि ह्याला(बडा सय्यद) मीच ठार करतो हां माझ्याजवळ येऊं दे असे महाराजांचे म्हणने न ऐकलेंसे करुन सय्यदानें उगारलेली ती तरवार आपल्या अंगावर घेतली आणि त्या वीराने आपल्या तरवारीनें सय्यदचे दोन तुकडे केले.कावजी,दोघे कंक,अभिमानी इंगळे,शूर मुरुंबक,त्याच प्रमाणे करवर,क्रूर काटके,गायकवाड अाणि सिद्दी ह्यांनी आवेशाने लढणार्या दुसर्याहि शत्रूंना पटापट पाडलें.खांदे व हात तोडलेलीं,पाय तोडलेलीं त्यांची शरीरें येथें चकाकूं लागलीं.श्रीनृपसातवाहन शके १५८१ विकारीनाम संवत्सरी,मार्गशीर्षमासी,शुक्
-श्रीशिवभारत
______________________________
______श्रीनृपसातवाहन शके १५८१ विकारीनाम संवत्सरी,मार्गशीर्षमासी,शुक्
"हा तो शिवप्रताप दिन होय...!"
हे युद्ध महाराजांच्या टाईमलेस आणि टाईम मेनेजमेंटचे उत्तम उदाहरण आहे.
केवळ या लढाईवर एक थोराड जाडजूड ग्रंथ तयार होईल.या लढाईतील केवळ अफजलखान मारला हाच इतिहास आता पुरा नव्हे.तो आम्ही इयत्ता चौथी पासून ऐकतो वाचतोच आहोत.या लढाईत महाराजांनी वापरलेली युद्धनीती,वेळेचे नियोजन आणि सर्वात महत्वाचा सह्याद्रीचा अभ्यास करत सह्याद्रीचा योग्य उपयोग केला.अशा कित्येक गोष्टी या लढाईतून शिकता येतील.तो दुर्गपुरुष किल्ले श्रीप्रतापगड व त्यावर स्थित महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई भवानी या सर्व घटनांचे जिते जागते साक्षीदार आहेत.अफजल खानाची ही लढाई इतिहासाच्या दृष्टीने तितकीच महत्वाची होती.त्यानंतर ज्या गतीने स्वराज्य संवर्धित होत गेल वाढत गेल तो वेग वखाणण्याजोगा होता.या लढाईचा जो फायदा घेऊन महाराजांनी शत्रूंना सावध होण्याच्या आतच सर्पराईझ अॅटॅक केले.
_______आप्जुल्याचे शीर मुरुंबदेव डोंगर स्थित किल्ले श्री राजगडाच्या बालेकिल्ल्याच्या भरभक्कम बलदंड बुरुजांच्या आत श्री जननी देवीच्या समोरील कोनाड्यात पुरले गेले.त्या नंतर महाराज हयात असे पर्यंत कुण्या गनिमाची छाती कधी राजगडाच्या आसमंताला भिडण्या इतपत मोठी झाली नाही.
आफ्जुल्याचे गाडलेले शीर त्यांच्या सव्य अपसव्य असणार्या नातलगांना सांगत राहिले.
"या देशीच्या राजाशा युद्ध म्हणजे जणू त्या कैलासावरील शिवासम या सह्याद्रीच्या शिवाशी व त्याच्या शिवगणांशी टक्कर घेणे म्हणजे यमाशी युद्ध करणे होय..!"
मरणोत्तर वैर संपते महाराजांनी मरणोत्तर आफ्जुल्याचे शीर नसलेले शरीर तेथेच प्रतापगड पायथ्याशी केवळ अडीच हात जागेत पुरले..!
"पण,आता त्याला पाय फुटून तो अडीच एकर एवढा मोठा झाला.
आफ्जुल्याला सुफी संत ठरवून त्याचा समाधी विस्तार करणारी स्वाभिमान शून्य महाराष्ट्राची जनता व राजकारणी लोक हे सुद्धा आफ्जुल्या इतकेच बेईमान होंत हे नक्की...!"
______अफजलखान मारला "शिवप्रताप" घडलां..
पण, तो पराक्रमही तिथी व तारखेच्या वादात मातीमोल करणारे तुमच्या माझ्या सारखे सो कॉल्ड शिव प्रेमींही त्या अफ्जुल्या इतकेच बेईमान होत.
हे मनांत कोरुन ठेवणे...!
धन्यवाद..
-नवनाथ आहेर
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा