दुर्गपती
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
"सह्याद्री म्हणजे एक अनमोल अलंकार व या अलंकारातील एक अस कोंदण ज्याच्या असण्याने संपुर्ण अलंकाराची शोभा वाढावी तो म्हणजे रायगड.याच रायरीच्या पर्वतावर छत्रपती शिवरायांनी अखेरचा श्वास घेतला.महाराज शरीराने अस्त पावले मात्र त्यांच्या विचारांचा वारसा ते आपल्याला एखाद्या संजीवनीप्रमाणे मागे सोडून गेले.उभी हयात खुद्द कळीकाळावर मात करत स्वराज्य निर्माण करत्यांस केवळ शब्दांत बांधणे हे सर्वात कठीणतम काम होय.किल्ले साल्हेर ते किल्ले जिंजीपावेत सबंध दुर्गांची शृंखला याची साक्ष देतेय ते सांगतायेत आपल्याला त्यांच्या पराक्रमाचे तेज..... ते ऐकण्यासाठी आपण येथे आलोच पाहिजेत.शांत चित्ताने पराक्रमांचा वारसा सांगणार्या या रणमर्दांच्या चरणधूळीला भंडारा समजून भाळी ल्यायलेच पाहिजे.
हि नुसती साधी सुधी चरणधूळ नाहीये.हे चंद्र सुर्य असे पर्यंत ज्यांच्या पराक्रमाची किर्ती अजरामर राहिल अशा महाराष्ट्र देशीचे स्वामी दुर्गपती शिवभूपतींची आहे.कित्येक सल्तनती आणि बारा टोपीकरांना उचकटवून फेकणार्या बुद्धी व पराक्रमाचा हा बेल भंडारा आहे...!"
#दुर्गपती
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा