संघर्ष-नवनाथ आहेर


______आपल्या देशाने कित्येक आक्रमकांना तोंड दिले.हा कालखंड काही थोडा नाही सहाव्या शतकापासून ते १९४७ पर्यंतचा शेकडो वर्षांचा हा कालखंड आहे.हा संघर्ष काही फक्त सत्तांचाच नव्हता त्यासोबतच तो संस्कृती व धर्माचा देखील संघर्ष होता.अलेक्झांडरच्या आक्रमणाने साधारणपणे या परकीय संघर्षाची सुरुवात झाली.तो विविध देशांना चिरडत अगदी तक्षशिलेपर्यंत येऊन पोहोचला तेथील राजा अंभीबरोबर करार करुन तक्षशिलादेखील ताब्यात घेतली. अनेक छोटी राज्ये तसेच संस्थांनांवर त्याने आपला अंम्मल बसविला.याच कालखंडात आचार्य चाणक्यांच्या हुशारीने मौर्य साम्राज्य स्थापन झाले व या साम्राज्याने बराचसा भाग आपल्या अधिपत्याखाली आणला.
       पहिले अरब आक्रमण झाले ते इ.स.६३६ मध्ये मोहम्मद बिन कासिम याचे.त्याने पुन्हा इ.स.७११ मध्ये आक्रमण करुन दाहिर राजाचा पराभव केला व अरबांना हिंदूस्थानात येण्याची जणू वाटच मोकळी करुन दिली.याच्या सैन्याने हिंदूस्थानातील महिलांवर प्रचंड अत्याचार केले.काही महिला पळवून नेल्या,प्रचंड लुटलूट केली.यावेळी राजा बाप्पा रावल यांनी अफगाणिस्थानापासून ते अरब पर्यंत अरबांना उखडून टाकले.पुढे जवळपास इ.स.१००० पर्यंत हिंदूस्थानावर परकीय आक्रमणे झाली नाहीत.
         नंतर मोहमद गझनीने पेशावरवर  हल्ला केला व जवळपास २५ वर्षात त्याने १७ अक्रमणे केली याकाळात त्याने भारताची सर्वाधिक लूट केली व मंदिरांची तोडफोड केली.इ.स.१०१८ मध्ये कन्नोजवर आक्रमण करुन गुजरातचे प्रसिद्ध सोमनाथाचे मंदिर उध्वस्त केले.गझनीच्या १७ आक्रमणांमुळे उत्तर हिंदूस्थानातील बरीचशी राज्ये पुर्णत: खिळखिळी झाली.त्यामुळे आपला अंम्मल बसविण्यास पुढील सुलतानांना वाट मोकळी झाली.
     पुढे मोहम्मद घोरीने इ.स.११८२ मध्ये आक्रमण केले.पण देहली व अजमेरचे राजे पृथ्वीराज चौहाण यांनी त्याचा अनेकदा पराभव केला मात्र कपटाने त्याने पृथ्वीराजांचा पराभव केला.पण पृथ्वीराज चौहाणांनीही मोम्मद घोरीला ठार केले.त्याचा प्रांताधिकारी म्हणून काम पाहणारा कुत्बुद्दिन ऐबक हा इ.स.१२०६ मध्ये स्वतंत्र्य सुलतान झाला.याची सत्ता जवळपास इ.स.१२८७ पर्यंत होती.तेराव्या शतकात बंगालच्या अगदी पुर्वेकडील भाग, ओरिसा, राजस्थान वगैरे काही भाग सोडला तर उत्तर हिंदूस्थानात परकियांचा बर्यापैकी अंम्मल बसला होता.पुढे अल्लाउद्दीन खिलजीने हिंदूस्थानावर आक्रमण केले.याचवेळी दक्षिणेकडे यादव घराणे, होयसळ घराणे, काकतीय वंशाचे घराणे त्याच्या पलिकडे चोल राजवंशाचे घराणे राज्ये करत होती.यांचे आपआपसातच संघर्ष सुरु होतो.सर्वांनी एकत्रित येऊन अल्लाऊद्दीन खल्जीचा पराभव करण्याऐवजी ते आपआपसातच झगडत राहिले.
_______अल्लाउद्दीन खल्जीने उज्जैन, मांडू, धार, चंदेरी इ. माळव्यातील शहरे हस्तगत करून राजपुतान्याचा बराचसा भाग जिंकला. त्यानंतर त्याने दक्षिण हिंदुस्थान जिंकण्याकरिता मलिक कफूरची नेमणूक केली.त्यापूर्वी इ.स.१२९४ मध्ये त्याने देवगिरीच्या यादवांचा पराभव केला होता. पुढे मलिक कफूरने १३०३ व १३०९ मध्ये काकतीयांविरुद्ध व १३०७ आणि १३११ मध्ये यादवांविरुद्ध मोहिमा काढून तेथील राजांना मांडलिकत्व पत्करायला लावले. १३१० मध्ये होयसळांचेही राज्य त्याने हस्तगत केले. अलाउद्दीनच्या मृत्यूनंतर प्रांतानुरुप असणारे सुभेदार स्वतंत्र होऊ लागले.तुघलक घराण्यातील दुसरा सुलतान मुहम्मद तुघलक हा अत्यंत महत्त्वाकांक्षी होता. त्याने प्रथम काश्मीर आणि काही छोटी राज्ये घेऊन दिल्लीहून महाराष्ट्रात दौलताबादला (देवगिरी) राजधानी नेली.पुढे इ.स.१६३६ मध्ये विजयानगर राज्याची स्थापना झाली. त्यानंतर इ.स.१३४७ मध्ये तुघलकांच्या अल्लाउद्दीन बहमनशाह उर्फ हसन गंगू या सुभेदाराने बहमनी सत्ता  स्थापून केंद्रीय सत्ता झुगारून दिली.इ.स. १३९८ साली समरकंदच्या तैमुरलंगाने हिंदुस्थानवर स्वारी करून दिल्ली लुटली. परिणामतः तुघलकांची सत्ता दुबळी होऊन गुजरात, माळवा आणि जौनपुरचे वेगवेगळे सुभे झाले.इ.स. १४९०-१५१२ या दरम्यान दक्षिणेत बहमनी राज्याचे अहमदनगर, विजापूर, गोवळकोंडा, बीदर आणि एलिचपूर येथे पाच स्वतंत्र शाह्या स्थापन होऊन तुकडे पडले. विजयानगर राज्याचा विस्तार दक्षिणेस झाला. पश्चिम आणि पूर्व सागरकिनाऱ्याला विजयानगरच्या हद्दी भिडल्या होत्या.इ.स.१५६५ मध्ये  तालिकोटच्या लढाईत अहमदनगर, विजापूर, गोवळकोंडा व बीदर येथील सुलतानांच्या संयुक्त सैन्याने विजयानगरचा पाडाव केला.
_____असाच हा संघर्ष पाचही शाह्या,औरंगजेब नंतर अब्दाली आणि पुढे अगदी इंग्रजांनी भारत देश सोडला तोपर्यंत चालूच राहिला.या प्रदिर्घ कालखंडाच्या संघर्षाने देश अगदी पिच्चून निघाला.यादवांच्या पाडावाआधी परकीय आक्रमक वादळासारखे येत व निघून जात पण त्यानंतर ते येथेच स्थायिक झाले आपल्या सत्ता विस्तारत नेल्या.सत्ता संघर्षाच्या या जिवघेण्या शर्यतीत आपल्याकडीलच लोक सैन्य म्हणून वापरले गेले व आपल्याच लोकांवर अत्याचार केले.मात्र आपली भारतीय संस्कृती इतकी उदात्त आहे की आज आपल्याला माहीत देखील नाहीत किंवा आपण म्हणू शकत देखिल नाही की हे ग्रिकांचे वंशज आहेत किंवा हे कुठल्या शाहीपैकी कुणाचे तरी वंशज आहेत.ते येताना त्यांनी त्यांच्या संस्कृत्याही घेऊन आले मात्र त्या संस्कृत्याही आपल्या संस्कृतीने संपवून त्यांनाही येथेच या मातीत मिसळून घेतले.
______पारतंत्र्याची हा कालखंड संपून आता ७४ वर्षे लोटली आणि आपण आता पुन्हा एकदा उत्थानाच्या वाटेने यशस्वीपणे मार्गक्रमण करत आहोत.महासत्ता,महागुरू वगैरेच माहित नाही मात्र या गतवर्षात भारताने आपल्या संस्कृतीवरचा पारतंत्र्याचा डाग मात्र पुसून काढला आहे.विज्ञान,तंत्रज्ञान, शिक्षण व आर्थिक स्थैर्य याबाबतची आपल्या देशाची वाटचाल खर्या अर्थाने वखाणण्याजोगी आहे.आज आपण एक समर्थ राष्ट्र म्हणून कणखरपणे उभे राहण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत.
यावेळी डॉ.कुमार विश्वास यांच्या ओळी मनास भावतात, 
  "हमने लौटाये सिकंदर,
सर झुकाये मात खाये.
हमसे भिडते है वे जिनका मन धरा से भर गया है.
नर्क मे तुम पुछना अपने बुजुर्गों से कभिभी.
उनके माथे पर हमारे ठोकरों का हि बयां है....!"

सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या खुप खुप शुभेच्छा..! 

धन्यवाद...!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शूर्पारक अष्टागर

नाणेघाट लेख-जयंत कुलकर्णी