सह्याद्रीनामा
"चालुक्यांचे सामंत या नात्याने महाराष्ट्राच्या उत्तर सरहद्दीचे संरक्षण करण्याची जबाबदारी यादवांवर होती.यासाठी त्यांनी अजंठा श्रेणीत अनेक गड उभारले.सम्राटांनी सामन्तांचे सामर्थ्य मर्यादित ठेवले नाही.यादव प्रबळ झाले आणि त्यांनी सम्राटपद मिळविले.शिलाहार हेही चालुक्यांचेच सामंत.या घराण्याच्या शाखा घाटमाथ्यावर आणि कोकणांत राज्ये करीत होत्या.महाराष्ट्राची पश्चिम सरहद्द आणि समुद्र किनारा सांभाळण्याची जबाबदारी शिलाहारांवर होती.या घराण्यांपैकी कोल्हापूरचे शिलाहार विशेष करुन नावारुपांस आले.त्यांची राजधानी पन्हाळ्यावर होती.या घराण्यातील जतिग शिलाहाराचा उल्लेख 'पन्नाल-दुर्गाद्रि-सिंह' असा करण्यात आलेला आहे.या घरण्यातील अखेरचा राजा दुसरा भोज याच्या कारकिर्दीच्या आरंभी तो चालुक्यांचा सामंत होता.तो स्वत:ला महामंडलेश्वर म्हणवीत असे.त्याच्या राजवटीचा काळ महाराष्ट्रात मोठ्या धामधुमीचा होता.
चालुक्यांची सत्ता संपुष्ठात येत होती,त्यांची जागा घेण्यासाठी यादवांची धडपड चालू होती.भोजाने या परिस्थितीचा फायदा घेऊन जागोजाग प्रचंड किल्ले उभारले ,स्वत:चे सामर्थ्य वृंद्धिगत व संघटित केलें आणि नंतर मांडलिकत्व झुगारुन देऊन राजाधिराज व पश्चिम चक्रवर्ती हि बिरुदे धारण केली.भोजाने केळंज,चंदन,नंदगिरी उर्फ कल्याणगड,पन्हाळा,पाण्डवगड,पावनगड,बावडा,भूधरगड,रांगणा,वसंतगड,विराटगड,खेळणा उर्फ विशाळगड,वंदन,सातारा व सामानगड हे किल्ले भोजाने बांधले.भोजाचे तथाकथित चक्रवर्तित्व यादवांना सहन झाले नाही; कारण,केंद्रसत्ता सर्वसामर्थ्य करण्याचे यादवांचे धोरण होते.सिंघण यादवांने १२०९ साली भोजाचा पराभव केला आणि कोल्हापूरचे शिलाहार घराणे बुडविंले.या घटनेवरुन महाराष्ट्रातील इतिहासांत एक सिद्धांत प्रस्थापित झाला की अपरान्तातील,सह्याद्रीतील किंवा घाटमाथ्यावरील सत्ता कीतीही समर्थ झाली तरी ती पठारावरील मैदानी सत्तेशी स्पर्धेशी टिकाव धरु शकत नाही.
महाराष्ट्रातील मध्ययुगिन साम्राज्ये मैदानी होती आणि त्यांचे सामंत डोंगरी होते.शत्रूपासूनच नव्हे तर वेळेप्रसंगी स्वत:च्या प्रजेपासून,समानाधिकारी प्रतिस्पर्ध्यापासून आण् केंद्रवर्ती साम्राज्यसत्तेपासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी सामन्तांनी जागोजाग किल्ले उभारले.
😊
#सह्याद्री
#pic_Amol_taLekaR
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा