पानिपत रणसंग्राम स्मृतीदिन-नवनाथ आहेर
_______आज १४ जानेवारी पानिपत संग्राम स्मृतीदिन.
१४ जानेवारी १७६१ पानिपतचा युद्धप्रसंग म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातील एक अविस्मरणिय घटना होय.मराठ्यांशी टक्कर देत देत अखेर याच मातीत संपलेला औरंगजेब व त्यानंतर दिल्ली व मोंगल साम्राज्य जवळपास संपुष्टातच आले होते.खुद्द मोगलांचे सरदार,निजाम,आयोध्येचे नवाब ,रोहिले इ.सर्व स्वतंत्र्य झाले होते.राज्य वाढविण्याचा तर सोडाच पण राज्य टिकविण्याचीही शक्ती आता मोंगल सत्तेत शिल्लक राहिली नव्हती.त्यातूनच नादिरशहाच्या स्वार्यांपासून वायव्येकडूऩ आफगांचे हल्ले हिंदुस्थानावर होऊ लागले होते.पंजाबचा सुभा हि आफगाणी आक्रमणे पेलूं शकला नाही व राज्याची सरहद्द दिल्लीतपर्यंत येऊन पोहोचली.अशावेळी दिल्लीच्या मदतीला कुणीही धावून गेले नाही गेले ते फक्त मराठे.
' मोगल साम्राज्यात आपला प्रभाव बसवून सम्राटांना आपल्या ताब्यात ठेवून सबंध हिंदुस्थानावर आपला आधिकार बसवावा अशाच महत्वकांक्षा मराठ्यांनी मनी बाळगली होती.'
आणि याच सुमारास वायव्येकडून होणारे आफगाणी हल्ले हे भारतीयांचे शत्रू निर्माण झाले.या हल्ल्यांना तोंड देण्याचे महान कार्य आपल्या पुर्वजांनी येथे केले आहे.आफगाणांना पाचारण करुन पुन्हा एकदा मोगली सत्तेच्या पुनरुज्जिवनाची स्वप्न पाहणारे नजिबखान रोहिला व शुजाऊदौला यांना आफगाण चालत होते पण मराठे नको होते.याऊलट महाराष्ट्रापासून शेकडो मैल लांब पानिपताच्या रणक्षेत्रावर मराठ्यांनी आफगाणांशी टक्कर घेतली.नजिबखान व सुजाऊदौला यांना तर मराठे नकोच होते पण हिंदुस्थानातील इतर लढवैया जमातींनीही यावेळी मराठ्यांना सहकार्य केले ऩाही.कुणाचेही सहकार्य नसताना मराठ्यांनी वायव्येकडून पेटत आलेल्या आफगाण ज्वाळेवर मराठ्यांनीच झेप घेतली व हजारो लाखो प्राणांचे बळी देऊन हि ज्वाळा अखेर मराठ्यांनीच शांत केली.
"पतंग जळून मरावेत पण त्यामुळे दिवाही विझावा..!"
अशी स्थिती पुढे निर्माण झाली व या संग्रामातून प्रेरणा घेत पंजाबात शिखांचा उदय झाला व दक्षिणेकडील आफगाणांची वाट रोखली गेली.
_______जेव्हा एखादा माणूस सहज बोलून जातो की पेशवे आय्याशी होते,त्यांच्या सैन्यात बाजार बुणगे व इतरांचीच संख्या मोठी होती म्हणून मराठ्यांचे पानिपत झाले.म्हणूनच मराठे पानिपतावर हारले.नाही नाही नक्कीच नाही जेव्हा आपण समकालीन साधनांचा अभ्यास करतो.त्या वेळीचा पत्रव्यावहार तपासतो.तेव्हा लक्षात येत की वरील कारणे कीती फोल आहेत.
याठिकाणी पानिपत लढाईच्या थोडे दिवस पुढचे पत्र देत आहे.
(पत्र मोठे असल्याने महत्वाचाच भाग येथे देत आहे.)
_____________________________________
श्रीशंकर
"श्रीमंत राजश्री बाबूराव फडणीस स्वामींचे सेवेसी:-
सेवक जिवाजीनाईक येवलेकर मुक्काम उज्जनी कृतानेक साष्टांग नमस्कार विनंती उपरी येथील कुशल तागाईत माघ वद्य २ रविवार मुक्काम उजनी येथें आपले आशिर्वादेकरुन सुखरुप असों.विशेष इकडील वर्तमान तर:-श्रीमंत थोरले भाऊसाहेब व श्रीमंत राजश्री जनकोजी शिंदे हे दोघे मात्र व काहीं फौज थोडीशी घेऊन जे समयीं लढाई जाहाली,ते समयीं झुंज मातब्बर जाहालें.गिलच्यांकडील माणूस मारले गेले चाळीस हजार,व गिलच्यांकडील सरदार.दोन मातब्बर पडले.सावकारी खबर तो ऐंशी आहे कीं,मुख्य गिलच्याचा लेख उंबरशहा,मलकाजमानीचा जांवई,तो झुंजात ठार झाला आहे.तोफेंच्या लढाईत गोळा लागला तो खरा खुरा मारला गेला.दुसरे नजिबखान तो मारला ह्मणतात.परंतु त्याची खबर ठिक नाही कोणी ह्मणतो मारला गेला; हेच ते खरें....................................आणखी,श्रीमंत,जे समयीं विश्वासराव दिसेनात ह्मणोन हत्तीवरुन उतरले,इतकाच काय तो फेर पडला;त्यामुळे त्यांनी मोड काल्लीं.नाहीं तर फत्ते जाहली होती..........................................मिति माहे वद्य २ शनवार.याजपाशी पत्रें देणें,लष्करांत रवाना करुं,सेवक पदरचा आहे."
_____________________________________________________
_____फार थोड्या कारणांहून या युद्धास कलाटणी मिळाली.या युद्धात मराठ्यांचा जरी पराभव झाला या पराभवाची कारणे शोधण्याची अवश्यकता नाही.तो प्रश्न महत्वाचाही नाही.वर दिलेले पत्र
बोलकेच आहे.लढाईच्या दिवशी अगदी दुपारपर्यंत मराठ्यांनीच मैदान मारले होते.असो.....!
महत्वाचे आहे ते मराठ्यांनी पानिपतच्या रणसंग्रामावर गाजविलेले अद्भुत व अगम्य शौर्य.प्रत्यक्ष मृत्यू डोळ्यासमोर असताना त्यांनी न डगमगता केलेले रणकंदन.पानिपतानंतर पुढे ४० वर्षे भारताचा जवळपास निम्मा भाग मराठ्यांच्या ताब्यात किंवा मराठ्यांच्या प्रभावाखाली होता.पुढे ४० वर्षानंतरही जेव्हा इंग्रज भारतावर आपली सत्ता गाजवू पहात होते.तेव्हाही दिल्लीपासून तुंगभद्रेच्या किनार्यापर्यंत व गुजराथपासून ओरिसा पर्यंत इंग्रजांना टक्कर दिली ती मराठ्यांनीच.
"होय आम्ही जरी आज प्रगती करतो आहोत,जरी आधुनिकतेकडे वाटचाल करत आहोत तरी इतिहासाच्या या घटनांचा आम्हाला सार्थ आभिमान असायलाच हवा.हि प्रेरणा शिवराय,संभाजी राजे हा मायबाप सह्याद्री यांची प्रेरणा आहे.पानिपतावर घडलेल्या रणसंग्रामात लढलेला व कामी आलेला हर एक विर हा अनसंग वॉरियर आहे.यातून आम्ही प्रेरणा घेणे गरजेचे आहे."
"पानिपत रणसंग्रामावर मैदान गाजवताना कामी आलेल्या सर्व रणमर्द मराठी विरांना मानाचा मुजरा व विनम्र अभिवादन...!"
धन्यवाद..!
-नवनाथ आहेर
(छायाचित्र(पेंटिंग) समकालीन आहे.)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा