निशाण आणि शस्त्र-नवनाथ आहेर

"निशाण आणि शस्त्र"

____हे कुठल्याही राज्याच्या महत्वाच्या निव असतात.
राज्याचे निशाण पडले तर राज्य पारतंत्र्यात अर्थात दुसर्याच्या ताब्यात जाते.कुठल्याही वारफेअर मध्ये निशाण हि अत्यंत महत्वाची गोष्ट आहे.म्हणून निशाणाला राखण्यासाठी शस्त्राचा वापर करावा लागतो.या एकमेकांना पुरक गोष्टी आहेत.निशाण राखण्यासाठी शस्त्र तर स्वराज्य राखण्यासाठी निशाणाचे रक्षण.याचे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे स्वराज्या चरणी अजन्म निष्ठा वाहणारे एक मातब्बर सरदार नव्हे ते स्वत:च एक राजेच होते ते म्हणजे कान्होजी नाईक जेधे यांचे पुत्र बाजी जेंधेंच.लढाई खळद बेलसरची साल होत १६४८ फत्तेखानाच्या मुसक्या आवळायच्या अस माहाराजांनी ठरवले न पुरंदराहून फत्तेखानाच्या छावणीच्या दिशेने बिनीच्या तुकडीने कूच केले. तिच्यामागोमाग इतरही मावळे निघाले. सगळ्यात शेवटी निघाली भगव्या झेंड्याची तुकडी. या तुकडीत एका जवान मावळ्याच्या हाती भगवा झेंडा होता. या तुकडीत तगडे पन्नास-पंचावन्न आडदांड मावळे सामील झाले होते. पुरंदराहून हे वादळ फत्तेखानाच्या छावणीच्या रोखाने खळद-बेलसरकडे घोंघावत निघाले. भगवा झेंडा वार्‍यावर फडफडत होता!
मराठ्यांच्या तुकड्या बेलसरच्या परिसरात घुसल्या आणि इशारत होताच फत्तेखानाच्या छावणीवर तुटून पडल्या! खानाचे लष्कर लढाईस सज्ज झाले. भयंकर हाणामारी सुरू झाली. आपलं बळ कमी पडतंय हे जाणून मराठ्यांची बिनीची तुकडी हळूहळू काढता पाय घेऊ लागली. झेंड्याची तुकडी मात्र माघारी फिरली नव्हती. उलट त्या मर्दांनी शत्रूवर जोरदार हल्ला चढविला. खानाच्या सैन्याने झेंड्याच्या तुकडीला घेरले. गनिमांनी अगदी झेंड्यावरच गर्दी केली. झेंडा हेलकावू लागला. झेंडा पडला तर अब्रूच गेली. प्रत्येकजण झेंडा वाचविण्यासाठी शर्थ करू लागला. झेंडा धरलेल्या जवानाला गनिमांपैकी कोणाचा तरी इतक्या जोरात घाव बसला की तो स्वार घोड्यावरून खाली कोसळलाच. त्याच्या हातातला झेंडा निसटला. आता झेंडा जमिनीवर पडणार इतक्यात... एका तलवारबहाद्दराने झेंडा वरच्यावर पकडला. जखमीस्वाराला तशाच जलदगतीने दुसर्‍या एका घोड्यावर घेऊन झेंडा आपल्या हाती ठेवला आणि तुकडीला माघार घेण्याचा हुकूम केला. झेंडा हातात तोलीत त्या समशेरबहाद्दराने झेंड्याच्या तुकडीसह पुरंदराकडे कूच केले. झेंड्याभोवतीच्या गनिमांना कापून जमिनीवर पडणारा झेंडा हवेत वरचेवर झेलून मराठ्यांची अब्रू वाचवणार्‍या त्या समशेरबहाद्दराचे नाव होते बाजी जेधे! कान्होजी जेध्यांचा लेक!प्रतापगड युद्धात मर्दुमकी गाजवणार्‍या कान्होजी जेंध्याचा पुत्र बाजी जेथे यास महाराजांनी त्याच्या अतुलनीय शौर्याबद्दल ‘सर्जेराव’ ही पदवी बहाल केली. बाजी जेध्यांचा झाला ‘बाजी सर्जेराव जेधे’! यानंतर पुरंदरच्या पायथ्याशी झालेल्या युद्धात फत्तेखानाचा दारुण पराभव झाला. महाराजांची अस्मानी फत्ते झाली! 
_______स्वराज्याचे निशाण भगवा जरी पटका या साठी मराठ्यांची शस्त्रे पारजली,मराठ्यांच्या तरवारी इमानदारांसाठी नेहमी म्यान असत पण याच  तरवारी या भगव्यासाठी न अन्यायाविरुद्ध म्याना बाहेर येत शत्रूवर कोसळल्या..!
न कधी कधी याच भगव्यासाठी गनिमांच्या नंग्या तरवारींना निष्ठावंत मराठ्यांनी आपली शरीरे बहाल केली.
एकूणच

"निशाण व शस्त्र मानाचं...!"

-नवनाथ आहेर


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संघर्ष-नवनाथ आहेर

शूर्पारक अष्टागर

नाणेघाट लेख-जयंत कुलकर्णी