सह्याद्रीनामा
______चालुक्य,राष्ट्रकुट,यादव ही साम्राज्यें मैदानीं होती.सातवाहनाच्या सत्ते प्रमाणेच यांचाही प्रारंभ सह्याद्रीच्या दर्याखोर्यांतच झाला आणि पठारावर व सुपिक मैदानांवर विस्तार झाल्यानंतर त्यांचे सह्याद्रीकडे दुर्लक्ष झाले.ज्यामानाने सह्याद्रीत त्यांनी भिस्त ठेवली म्हणजे अवलंबून राहिले ते पर्यंतच ते टिकले.जेव्हा ते केवळ मैदानी तयारीवर अवलंबून राहिले तेव्हा परकीय आक्रमकांच्या पहिल्या झटक्यातच कोलमडून पडले.ज्या प्रमाणे जास्तिच्या पाण्याने एखादे धरण फुटते व आजूबाजूचा सर्व प्रदेश नष्ट होतो.शेतीवाडी,घरे वाहून जातात व रहिवाशी परागंदा होतात तद्वत यांच्या मैदानी राजधान्यांचा पराभव होताच त्यांच्या सत्ता सर्वभक्षी काळाच्या ओघात लुप्त झाल्या.त्यांच्या साम्राज्याची धुळधाण झाली.मैदानी लढाईत आघाडीवरची एक फळी फुटली तरी घाटमाथ्यावर पिछाडिल एक फळी सज्ज खडी असे काही नियोजन यांनी केलेले नव्हते.याऊलट सातवाहन व चालुक्यांनी अपरान्त(कोंकण),कर्नाटक व आंध्र या प्रदेशांत आपले पाय घट्ट रोवले होते म्हणूनच त्यांची सत्ता इतर राजवंशाहून आधिक टिकली.यांचेही प्राथमिक पराभव यांचेही झाले पण यी पराभवानंतर ते पुन्हा उसळी घेऊन आपली सत्ता पुन्हा प्रस्थापित करु शकले.
_______राजाराम महाराज रायगडाहून निसटले व जिंजीस पोहोचले अर्थात जिंजीने त्यांचे रक्षण केले अर्थात स्वराज्याचे रक्षण केले व योग्य वेळ काळ पाहून पुन्हा मराठ्यांनी आपली सत्ता प्रबळ केली.यादवांच्या वेळी तर सामन्तांची दुय्यम व भक्कम फळी असतित्वातच नव्हती व असेल तरी ती तेव्हढी प्रबळ नव्हती.कल्याणी,मालखेड व देवगिरी यांच्या इतिहासात हे साम्य आहे.चालुक्य व राष्ट्रकुट आले व गेले,तेव्हाची क्रांती यांत मुलभूत भेद आहे.तेव्हां जे गेले ते व तेव्हा जे आले ते सर्वच आपले होते खर तर तेव्हाची क्रांती हि राजकीय क्रांती होती.पण,मध्युगिन महाराष्ट्राचा इतिहास शिवरायांपासून बारकाईने निरीक्षण केले की एक लक्षात येते की ज्या ज्या चुका या राजवटींकडून घडल्या त्या त्या सर्व चुकांतून शिकून त्याचा अभ्यास करुन जणू महाराजांनी स्वराज्याची संरक्षक बाजू बळकट केली असावी.
"सह्याद्रीतील कोणत्याही किल्ल्याचे आपल्याला दर्शन व स्मरण झाले की डोळ्यासमोर महाराज येती़ात व त्यांच्या प्रतापांचा पट आपल्या डोळ्यासमोर झळकू लागतो.प्राचीन व मध्ययुगिन राज्यकर्त्यांना त्यांच्या सैन्यांना वैशिष्टपुर्ण नुसार नरपति,हयपति,गजपती अशी विशेषने लावण्यात येत असत.पण,दुर्गपती व दुर्गराज हे विशेषण फक्त शिवरायांनाच लावण्यात येते.त्याचे कारणच हे आहे की,एखादी गाई जशी आपल्या वासरास सोडून लांब रहात नाही अगदी तद्वत महाराज सह्याद्री सोडून लांब राहिले नाहीत.अर्थात मायबाप 'सह्याद्री' हेच मराठ्यांच्या यशाचे गमक आहे.महाराजांनी सह्याद्रीतले किल्ले नव्याने बांधले व काहींची डागडूजी केली.या किल्ल्यांचे पुढिल कार्य इतके अजोड व आफाट राहिले आहे की यांच्या इतिहासाचे नुसतो अवलोकन करायला सुद्धा आपले दोन डोळे अपुरे पडतील..!"
______महाराजांनी स्वराज्यस्थापनेचा हा 'पण' सह्याद्रीच्या संगतीनेच सुरु केला.संकटांच्या समयी सह्याद्रीच रक्षिता झाला.
'सह्याद्री हा स्वातंत्र्याचा व स्वराज्याचा मूलाधार' आहे हे महाराजांना माहीत होते.'
म्हणून महाराज म्हणत की,"आमच्या या कठीण प्रदेशांत नुसता कल्पनेचा घोडा सुद्धा नाचवणें कठीण आहे."
प्राथमिक पराभव महाराजांचाही झाला तो पुरंधरचा तह वगैरे काही लढायांत पण महाराजांनी मागची फळी मजबूत केलेली होती न याच जोरावर पुन्हा उसळी घेऊन सत्ता प्रबळ करु शकले.म्हणूनच मराठ्यांचा इतिहास हा नेहमीच प्रेरणादायी आहे.त्यात सह्याद्री व गडकोटांचे योगदान महत्वपुर्ण आहे सह्याद्रीशिवाय स्वराज्याचे समिकरण पुर्ण होतच नाही.
😊
#सह्याद्री
-नवनाथ आहेर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा