जावळीच्या रानांत-नवनाथ आहेर
______६ मे १६५६ जावळीला चक्काचूर केले व राजे पन्हाळ्यावर दाखल झाले. या बाबत कवी भूषण लिहतात.
"चंद्रावल चूर करी, जावलीज पत्थ कीनो।
...........….
आफजल मारी डालो, तबल बजायके।
ये दिल सो बे दिलर हम कहे बार बार।
अब कहां सुख सिंह सिव ही जगायके।
भेजना हे भेजो सोरीसाले सिवराज जूकी।
बाजीगर नाले परनाले पर आय के ।
बाजीगर नाले परनाले पर आय के।"
____६ मे १६५६ चंद्ररायाच्या जावळीला जी एके काळी "द युनायटेड नेशन ऑफ जावळी" नावाने संबोधली जायची.त्या मातब्बरास अवघ्या २५ व्या २६ व्या वर्षी टक्कर देणारे शिवराय हे अद्वितीयच...!
१६४८ साली जावळीचा चंद्रराव
( दौलतराव ) मोरे यांचा मृत्यु झाला. दौलतराव हा निपुत्रिक
असल्यामुळे त्याच्या पत्नीने शिवरथकर मोरे या
घराण्यातून एक मुलगा दत्तक घेतला त्याचे नाव यशवंत. त्याला
शिवरायांच्या सहाय्याने गादीवर
बसवला.
"चंद्रराव" कीताब धारण केला.
पण,प्रत्यक कारभार मोरे
यांच्या पैकी हणमंतराव पाहु लागला. गेल्या नऊ पिढ्या
मोरे या जहागिरीचा उपभोग घेत होत्या.
एके दिवसी
आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोर्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण, शिवाजीराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे ‘चंद्रराव’ झाले होते. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला लागले आणि चंद्रराव मोर्यांनी महाराजांविरुद्ध सवता सुभा मांडला. चंद्रराव मोरे महाराजांचे उपकार विसरले.स्वराज्याशी बेईमान झाले.
दौलतीचा खांब होण्या ऐवजी मोर्यांनी दौलतीलाच आव्हान दिले.
१) बिरवाडी टप्पांखालील काही गावांचा अधिकार बाजी पाटील व मालोजी पाटील यांच्याकडे होता परंतु चंद्ररावाने त्यांना हुसकून लावले.ती गावे स्वतः बळकावली. इ.स. १६५१-५२ मध्ये हे पाटील महाराजांकडे मदत मागण्यासाठी आले, महाराजांनी त्यांची वतनावर पूर्ण स्थापना केली.चंद्रराव स्वाभाविकच चिडला असल्यास नवल नाही.
२) पुढे लवकरच स्वराज्यातील मुसेखोऱ्याचा गावकुळकर्णी 'रंगो त्रिमल वाकडे' याने एका विधवेशी सिंदळकीचा गुन्हा केला आणि शिवाजीराजे शासन करतील या भीतीने तो जावळीस आश्रयास आला.चंद्ररावणे त्यास आश्रय दिला आणि महाराजांची नाराजी स्वतःवर ओढावून घेतली.
३) चिखलीचा रामाजी वाडकर व चंद्रराव यांचे पूर्वीपासून वैर होते त्यामुळे चंद्ररावाने त्यास जीवे मारले. या रामाजीचा पुत्र लुमाजी प्राणभयाने रोहीडेखोऱ्यात आला.चंद्ररावाने सुद्धा त्याचा पाठलाग सोडला नाही. स्वराज्य कक्षेत असणार्या रोहीडेखोऱ्यात घुसून त्याने लुमाजीला ठार केले.
४) अशाप्रकारे शक्तीप्रदर्शन करणाऱ्या चंद्ररावाने आता भेदनीतीचा अवलंब केला, गुंजणमावळात देशमुखी कोणाकडे यावरून शिंदे-चोरघे-शिलिमकरयांच्यात जुना वाद होता. शिलिमकरांनी यापूर्वी फतहखान मोहिमेत महाराजांना साथ दिली होती, त्यामुळे साहजिकच महाराजांनी त्यांचा पक्ष देशमुखीसाठी उचलून धरला. परंतु चंद्रराव हे शिलिमकरांचे मामा असल्याने मन वळवण्याच्या प्रयत्न चंद्ररवाने केला.हे वृत्त समजताच महाराजांनी शिलिमकरांना ताबडतोब अभयपत्र पाठवून मनधरणी केली.
‘‘…तुम्ही काल राजे झालात. तुम्हाला राज्य कोणी दिले? आम्ही कोकणचे राजे असून आमचा राजा महाबळेश्वर! त्याच्या आणि बादशहाच्या कृपेने आम्हास सिंहासन मिळाले आहे. येता जावळी, जाता गोवळी?’’
राजगडाच्या सदरेवर मोर्यांनी उद्दामपणे लिहिलेले पत्र पंतांनी राजांना वाचून दाखविले. हा मग्रुरीचा जबाब ऐकून महाराज संतापले. मोर्यांना अखेरची संधी मिळावी म्हणून महाराजांनी पुन्हा एक पत्र मोर्यांना धाडलं
‘जावळी खाली करोन, हात रुमालांनी बांधून भेटीस येणे!’
पण, चंद्रराव व हणमंतराव गुर्मीला आले. कारणच तसे होते. कारण त्यांच्या ताब्यात होते जावळीचे खोरे!
मातब्बर लढवय्ये..
पट्टीचे रणधुरंदर..
जावळी तो वाघाची जाळी. जावळीचे खोरे म्हणजे महाबिकट मुलुख. जावळीच्या खोर्यात उतरणे म्हणजे मृत्यूच्या खाईत उतरण्यासारखे होते. याच जावळीच्या आणि आपल्या पायदळाच्या गुर्मीत मोर्यांनी राजांना उलट उत्तर पाठविले.
‘‘…जावळीत येणारच तर यावे. दारूगोळा मौजूद आहे. जावळीतून एकही मनुष्य माघारी जाणार नाही!’’
मोर्यांच्या पत्राची थैली राजगडाच्या सदरेवर पुन्हा एकदा उघडली गेली आणि महाराजांच्या संतापाचा कडेलोट झाला.राजगडावरुन हा सह्याद्रीचा नरसिंह कडाडला..
महाराजांनी ताडलं,आता साम दाम दंड भेद
मोर्यांस मारल्याविना स्वराज्य साधत नाही. जावळी स्वराज्यात येत नाही.शिवराय १५ जानेवारी १६५६ जावळीवर खासा चालून गेले.
महाराजांचे कान्होजी जेधे, हैबतराव शिळीमकर, संभाजी कावजी कोंढाळकर, नांदलनाईक यांना तातडीचे हुकूम सुटले. निवडक धारकरी जावळीच्या कीर्र जंगलात घुसले. एकदम भयंकर कालवा उठला. चर्तुबेट, जोर, शिवथर आणि खुद्द जावळीवर एकाचवेळी मराठ्यांचा छापा पडला.
जावळीचा मुलूख ताब्यात घेतला.तुडव तुडव तुडवला.जेवढे या जेत चंद्ररायाच्या आधाराने जगत होते.त्यांना मुळासकट उपटुन टाकले.
"त्यावरी जाउलीवरी मोहीम केली. कान्होजी नाईक यांस व अवघ्या देशमुखांस जामावानसी बोलाविले. जांबलीस मोरे होते. ते जेध्यांनी आधीच पिटाळून लाविले होते. जांबलीस मोरे कोणी नव्हते. जोरामध्ये हनमंतभाऊ मोरे होते. त्यावरी राजश्री स्वामींनी (शिवाजीराजे) रघुनाथ बल्लाळ सबनीस पुण्याहून स्वरांच्याजमावानसी पाठवले. त्यांनी हनमंतभाऊ यास मारून जोर घेतले, जाउली मात्र राहिली होती."
-जेधे शकावली
____या जावळीच्या युद्धाने शिवरायांस "रायरीचा त्रिशुंगी पर्वत" दिला.जो पुढे या देशीच्या राजधानीचा गड म्हणुन,अवघ्या पृथ्वीवर गाजला.
या जावळीच्या युद्धाने अनेक मातब्बर रणधुरंदर, नरशार्दुल या स्वराज्यास बहाल केले.
शिवरायांनी "आपले स्वराज्य" हा मंत्र त्यांच्या कानात ओतला आणि हे वीर गनिमांच्या तलवारींसमोर खडे ठाकले ते स्वराज्य संरक्षणार्थ...!
काय होते जावळीचे खोरे..?
अत्यंत दुर्गम, डोंगराळ आणि गर्द झाडीचा
जावळी प्रदेश अतिशय महत्वाचा भाग . या भागात
जांभुळ खोरे, कांदाट खोरे, शिवथर खोरे, तारळे खोरे असे अनेक खोरी होती.
घाट होते..
#शेर_सिव_राज_है
संकलन-
नवनाथ आहेर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा