अजिंठा डोंगररांगेचे महात्म-नवनाथ आहेर

*अजंठा डोंगररांगेचे महात्म*

______सातमाळा, बालाघाट व महादेव या सह्याद्रीच्या मुख्य पर्वत शाखा आहेत.सातमाळ्याची रांग ही खानदेश व नाशिक या जिल्ह्यांच्या सिमेवर आहे आणि चांदूर उर्फ अजंठा ही आग्नेयेकडे थोडीशी कललेली आहे व ती नाशिक जिल्ह्यातून जाते. अजंठा रांगेतील किल्ल्यांची बांधणी ही महत्वपुर्ण आहे. या श्रेणीतील मुख्य किल्ले म्हणजे अंकाई-टंकाई, देवगिरि, राजधेर वगैरे किल्ल्यांची रचना पाहिल्यास आपल्या लक्षात येते की या किल्ल्यांना तोडलेले कडे आहेत आणि यांची प्रवेशद्वारे ही विवरांतून निर्माण केलेली आहे.अजंठा रांगेतील किल्ल्यांना दोन कारणांमुळे महत्व होते व हि दोन कारणे केवळ खानदेश वा नाशिक परिसर नाही तर  महाराष्ट्राच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाची होत.

१)पहिले कारण म्हणजे अजंठा रांगेतील शेवटचा किल्ला म्हणजे देवगिरि होय व हा किल्ला यादवांच्या राजधानीचा किल्ला होता अर्थात त्या दृष्टीने किल्ल्याची संरक्षणात्मक रचना केली गेली होती.

 २)अजंठा डोंगररांग म्हणजे महाराष्ट्राचे रक्षण करणारी एक अत्यंत महत्वपुर्ण फळी आहे.हि फळी एकदा
 तुटली की मग आश्रय उरला तो केवळ सह्याद्रीचाच.अजंठा पर्वत रांग म्हणजे महाराष्ट्राचे उत्तरेकडील संघर्षक्षेत्र होय.अगदी प्राचिन काळात नर्मदा नदी हि महराष्ट्राची उत्तर सरहद्द होती.नर्मदेच्या उत्तरेस विन्ध्य पर्वत आहे तर नर्मदेच्या दक्षिणेला सातपुडा पर्वत आहे.पुर्वी याठिकाणी लोकसंख्या व लोकवस्ती अगदी विरळ होती.घनदाट जंगले होती.महाराष्ट्राची मध्ययुगीन राज सत्तांचे या भागावरील अधिपत्य या जंगल व विरळ लोकवस्तीच्या कारणामुळे अत्यल्प प्रमाणात होते.जे स्थानिक लोक होते ते तेव्हढे काही प्रगत वा राजकीय दृष्ट्या सशक्त नसल्याने त्यांचा या राजसत्तांना काही फारसा पाठींबा हा नव्हता.परिणामी या सत्तांना राज्य संरक्षण करण्यासाठी योग्य अशा योजनेची अवश्यकता होती.कमीत कमी शिबंदीच्या आधाराने या मुलुखावर आपली हुकूमत व शत्रूला जास्तित जास्त वेळ थोपवून धरण्यात यश मिळावे या गोष्टी नजरेसमोर ठवूनच या किल्ल्यांची योजना तयार केलेली आपल्या लक्षात येते.महाराष्ट्रात जी परकीय आक्रमणे आली बहुतांशी उत्तरेकडूनच महाराष्ट्रात आली.म्हणूनच त्यांना खानदेश व नाशिकच्या भागातच रोखने महत्वाचे होते.
        मागिल शतकाच्या सुरुवातीला इंग्रजांनी थोड्याफार प्रमाणाच्या प्रतिकारानंतर काबिज केले तेव्हा या किल्ल्यांच्या बाबतीत त्यांनी उद्गार काढले की, 
"या किल्ल्यांना वेढा घालणारे सैन्य कीतीही आफाट न सुसज्ज असले तरीही या किल्ल्यांतील पन्नास शंभर लढवैय्या मावळ्यांना पुरेसी रसद असेल तर हे किल्ले आरामात लढवता आले असते.वरुन नुसते दगड जरी ढकलून दिले तरी भली थोरली शत्रूची फौजही चार हात लांब रहावी अशी या किल्ल्यांची लढाऊ संरचना आहे..! "

_______आणखी विस्तृत लिहायचे झाल्यास या किल्ल्यांचे जे सामर्थ्य होते तेच यांचे दौर्बल्यही होते आता बघा जस की या किल्ल्यांवर जास्त शिबंदी ठेवता येत नाही व यामुळे मुळातच मनुष्यबळ कमी असल्याने समजा एखाद्या शत्रूने जर किल्ल्यास वेढा घतला तर त्याचा उपराळा करण्यासाठी जे युद्धतंत्र वापरावे लागते मग त्यात रात्रीच्यावेळी किंवा गाफील असताना शत्रूच्या वेढ्यावर छापा मारने वगैरे हे शक्य नव्हते.त्यात या किल्ल्यांवर एकतर शिडीने वा अरुंद अशा वाटेनेच जावे लागत असल्याने शिबंदीच्या हालचालींवर आणखी बंधने येतात.असे का तर याचाही विचार महत्वाचा आहे.या किल्ल्यांची उभारणी हि हातघाईच्या लढाईच्या दृष्टीने व किल्ल्यांहून तोफांचा मारा करने या युद्धपद्धतीच्या आधीची हि रचना आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे.हे किल्ले जर लढाईत पडले असतील तर त्याला अपुरी रसद, फितुरी,धास्ती याच कारणांमुळे पडले असतील.आता बघा शिबंदीतील एखादा नाईक वा पाईक जर शत्रूला फितूर असेल तर किल्ल्यावरील सर्व यंत्रणाशक्ती कोलमडते आणि आणखी महत्वाचे म्हणजे किल्ल्याच्या पायथ्याच्या वा रहाळातील प्रजेच्या निष्ठेवर किल्ल्याचे खरे सामर्थ्य अवलंबून असते.समजा किल्ल्यावर हल्ला झाला तरच गडावरील मावळे लढतील पण शत्रू सैन्याने मोजके सैन्य वेढ्याला ठेवून जर बाकी सैन्यासह राजधानीकडे कुच केले तर? 
अशा स्थितीत गडावरील शिबंदीने झपाट्याने गडावरुन उतरुन सैन्याचा बिमोड करायला हवा.राजधानीबाहेरील किल्ल्यांचे मुळ काम हेच की शत्रूची ताकद कमी करने. 
     हर्ष परमार या राजाने नित्यवर्ष खोट्टिग राष्ट्रकूटाचा पराभव नर्मदेच्या तिरावर खलिघट्ट येथे केला आणि तेथून साडेतीनशे मैलांवर असलेली राष्ट्रकूटांची राजधानी सावकाशपणे लुटली.यावेळी सरहद्दीवरील किल्ल्यांनी हे आक्रमण थोपवल्याचे दिसत नाही,तेथील सामंत लोक लढल्याचे दिसत नाही, किल्लेदार फितूर झाले म्हणा किंवा त्यांनी परमाराचे सैन्य पाहून धास्ती खाल्ली म्हणा त्यामुळे ते बाहेरच पडले नाहीत किंवा प्रजेचा पाठींबा नसल्याने ते दबा धरुन बसले असतील आणि पुर्वी एक विचारधारा अशी होती की मुख्य केंद्रीय सत्ता जरी बदलत असल्या तरी सामंत मात्र तेच होते.त्यांच्यामते जय वा पराजय कुणाचाही झाला तरी आपण आपली सत्ता कायम राखायची हि विचारधाराही याला कारणीभूत असू शकते.असो.
     दुसर्यांना मुंज परमाराने जेव्हा महाराष्ट्रावर अर्थात यादवांवर स्वारी केली तेव्हा मात्र यादवांच्या प्रतिकारामुळे व वरील कारणांच्या त्रुटीच्या अभावी परमरांचा पराभव झाला.पुढे जेव्हा परकीय आक्रमण यादवांवर आले तेव्हा शत्रूने सरहद्दीवरील सामन्त व किल्लेदारांच्या गैरसावधपणाचा फायदा घेतला आणि खुद्द देवगिरिसारख्या अद्वितीय किल्ल्याचा आधार असूनही यादवांना शरणागती पत्कारावी सागली.देवगिरिच्या तटबंधीने टिकाव धरला पण एकच प्रवेशमार्ग व फंद फितुरीमुळे रसद तुटली व खुद्द राजानेच कच खाल्ली व यादवांचा पराभव झाला.एकूणच काय तर हि संपुर्ण यंत्रणा किल्ल्यांच्या दृष्टीने महत्वाची असते.यातील एक जरी यंत्रणा फेल ठरली वा आपापला रोल पुर्ण करण्यात ते अक्षम ठरले तर शत्रू हा राजधानीला सरळ सरळ शह देतो.हिच महत्वाची आक्रमणे रोखण्याची कामे तात्कालीन काळात अजंठा डोंगररांगेतील किल्ल्यांनी इमाने इतबारे केली.
______सातवाहनांपासून इतिहासाच्या प्राचिन युगाच्या अखेरपर्यंत महाराष्ट्रावर जी परकीय आक्रमणे झाली ती निश्चित कोणत्या मार्गाने आली या बाबत जरी आपल्याकडे निश्चित पुरावा नसला तरी ती आक्रमणे याच मार्गांनी आलीत याचा अनुमानिक पुरावा मात्र आपल्या इतिहासकारांनी शधलेला आहे.महाराष्ट्रावर आक्रमण करणार्या क्षहरात क्षत्रपांचे लेख हे नाशिक, जुन्नर व कार्ले भागात अढळतात असे अनेक अनुमाणिक पुरावे आपल्या हाताशी आहेत.एकंदरीत महाराष्ट्रावरील उत्तरेकडील आक्रमण हे अजंठ्याच्या डोंगररांगेने व त्यांवरील दुर्गांनी रोखून धरले.म्हणून काही काळ का होईना महाराष्ट्राची स्वातंत्र्यलक्ष्मी आबादीत राहिली.या डोंगररांगेतील किल्ल्यांचे महात्म उच्च कोटीचे आहे इतिहासातील यांचे स्थान मोलाचे आहे हे तुम्ही आम्ही लक्षात घेऊन त्यांचे दर्शन, संवर्धन व पुजन करने गरजेचे आहे.

"इतिहासाची नेहमी पुनरावृत्ती होत असते हे ही आपण लक्षात ठवने गरजेचे आहे.फक्त वॉरची स्टॅटिक व हत्यारे बदलतात,राजकारणाच्या पद्धती बदलतात.कालचेच पहा ना दिडशे वर्षे भारतावर राज्य करणार्या इंग्लंडचा कारभार भारतीय वंशाचे दोघे जण सांभाळत आहेत.भारत येत्या काळात पुन्हा एकदा एक वैभवशाली व जगज्जेता होईल हे विधान एखाद्याने केल्यावर त्यात नवल वाटायला नको....!"

धन्यवाद...!

#सह्याद्री
      

संकलन
-नवनाथ आहेर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संघर्ष-नवनाथ आहेर

शूर्पारक अष्टागर

नाणेघाट लेख-जयंत कुलकर्णी