सह्याद्रीनामा
"किल्ल्यांच्या आधाराने गनिमी काव्याची लढाई करुन शहाजीराजेंनी उत्तर व दक्षिण हिंदुस्थानातील सुलतानांच्या व शहांच्या फौजांना हैराण केले होते.पाऊण लाख फौज बरोबर घेऊन दक्षिणदिग्विजयासाठी आलेल्या शहाजहीनला शहाजी राजेंनी सहा किल्ले व सात हजार स्वार यांच्या बळावर नमोहरम केले होते.गनिमी काव्याची हि पद्धत मराठ्यांची नव्हे ती प्रथम वापरली ती मलिक अंबरने... शहाजीराजेंनी या गनिमी कावा युद्ध पद्धतीची सह्याद्रीशी सांगड घातली व महाराष्ट्रापुरती एक वेगळीच युद्धनिती तयार केली.याच कालखंडात शिवरायांचा जन्म झाला.धामधुमीचा कालखंड असल्याने त्यांचे पालनपोषन हे गडांवरच झाल्याने या गडकोटांचे दुर्गश्रेणीचे महत्व त्यांच्या लक्षात आले.हि सर्व महाराष्ट्राची शक्तीकेंद्रे अाहेत व जर का यांचे एकत्रीकरण केले तर महाराष्ट्र पुढिल कालखंडात कोणत्याही बलाढ्य आक्रमणाला तोंड देऊ शकतो हे महाराजांच्या लक्षात आले.मावळांतील किरकोळ अंगकाठीच्या परंतु जबरदस्त काटक असणार्या शेतकर्यांचे शौर्य महाराजांच्या नजरेतून चुकले नाही.हि शक्ती तोंवर सुप्तावस्थेत होती,जोवर ती निष्क्रीय होती.महाराजांनी त्या शक्तीस जागृत करुन आणखी कार्यक्षम केली.महाराजांनी येथील मावळ्यांची निष्ठा संपादन केली व शहाजीराजेंच्या युद्धनितीचा वापर करत येथील मावळ मातीतील शेतकर्यांच्या शक्तीलाच स्वातंत्र्ययुद्धाचे स्वरुप दिले.पण,यात एक फरक होता शहाजीराजेंकडील सैनिक हे पगारी होते व ते तसेच लढले परंतू येथे मात्र स्वयंस्फूर्तीने लढाया लढल्या व म्हणून स्वराज्य टिकले.शिवरायांनी निर्माण केलेल्या या युद्धनितीचा प्रत्यय आपल्याला पुढे येतो तो म्हणजे महाराज हयात नसताना देखिल या युद्धपद्धतींत कसलेल्या मराठ्यांनी राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या शौर्याचा व निष्ठेचा प्रभाव मोंगलांच्या प्रत्ययास आणून दिला.
______सह्याद्रीत असणारे हे किल्ले शिवरायांच्या आमदानीपासून आक्रमकांशी नेटाने लढू लागले.किल्ल्यांतील मावळ्यांना भोंवतालच्या प्रदेशातून रसद मिळू लागली.आक्रमकांची रसद तुटली व चोहिंकडून छापे घालता येऊ लागले.एक किल्ला पडला तरी इतरांनी लढत रहायचे,फार काय तर किल्ला पडला तर बालेकिल्ला लढत रहायचा हि प्रथा येथपासूनच सुरु झाली.कित्येक असे प्रसंग आहेत हे सर्व शक्य झाले कारण,शिवाजी महाराजांच्या या स्वराज्य निर्मितीला सह्याद्रीचा आधार होता आणि नवचैतन्य जागृत झालेल्या महाराष्ट्राचा पाठींबा होता.शिवशाहीच्या आधी सह्याद्रीतील किल्ले हे दक्षिणी सुलतानांच्या राजनिष्ठ अशा स्वकीय व परकाय अंमलदारांच्या हाती होते.स्वतंत्र्य महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी उभारलेल्या सह्यांद्रीतील गडांच्या श्रेणींनीच महाराष्ट्राला शृंखलाबद्ध केले होते.एक क्रांती या किल्यांच्या अनुषंगााने घडली व ती वाचली की आजही आपल्या अंकावर काटा येतो त्याचा अभिमान वाटतो.
"सह्याद्रीतील किल्ले व त्यांच्या परिसरातील प्रदेश परक्यांना किंवा त्यांच्या प्रतिनिधींना केवळ धास्तीमुळे खाली करुन देणारे मराठे शिवरायांच्या नेतृत्वाखाली पुन्हा त्याच किल्ल्यांवर यशस्वीपणे अवरोहण करु लागले.हरकामी गुलाम म्हणून नव्हे;कणखर भारवाहक म्हणून नव्हे तर हक्क प्रस्थापित करण्यासाठी आलेला 'मालक' म्हणून व स्वराज्याचा भार वाहण्यासाठी सिद्ध झालेले स्वतंत्र्योन्मुख जनतेचे प्रतिनिधि म्हणून.किल्ल्यांवर बिगर हक्काने हुकमत गाजविणार्या परक्यांचा बळी घेण्यासाठी,दुबळे भासणारे मावळे शस्त्रसज्ज होऊन अंधार्या रात्रींही,वानरांच्या टोळीप्रमाणे झेपेंसरशी कडेकपार्या ओलांडून,अगम्य मानल्या गेलेल्या सडेसोट तटबंदीवर अरोहण करुन,गडावर एका एकी प्रकट होऊन तेथील नामवंत योध्द्यांबरोबर कसलेल्या विरांसारखे लढू लागले.यांत कघी विजय तर कधी पराजय तर कधी कधी गनिमांच्या नंग्या तरवारींना आपली शरीरेही बहाल करावी लागली."
______बापजाद्यांच्या या पराक्रमास पाहण्यास व अवलोकन करण्यास आज आमचे दोन डोळे पुरत नाहीत खरे पण,ज्यांच्या जिवावर हे सर्व घडलं ते किल्ले आजमितीस 'पर्यटकांच्या' व सर्वभक्षी 'काळाच्या' मगरमिठीत अडकलेत,आज त्यांच्याकडे 'इनकमिंग सोर्स' म्हणून न पाहता सह्याद्रीची ऊतराईही करायला हवी. म्हणजे या पवित्र धारातिर्थांवर पार्ट्यांचा नंगानाच करणार्यांना न एन्जॉयची ठिकाणे म्हणून समजणार्या नादानांची मस्तके ठिकाणांवर येतील...!
धन्यवाद...!
😊
#सह्याद्री
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा