दक्षिण दिग्विजय शिवकालीन उल्लेख-नवनाथ आहेर
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
______शिवरायांच्या राजाभिषेकानंतरच्या दक्षिणदिग्विजयाच्या वेळीच्या या घटना आहेत.राजधानी रायगडपासून १२०० ते १५०० कि.मी. अंतरावर असणार्या जिंजी व परिसरांत मराठ्यांच्या पराक्रमाची पाऊले रजलेली आहेत.तेवेनापट्टम, वालदूर परतीच्या वाटेवर
कोल्हारकोट,बाळपूरकोट,त्रिवादीकोट व कोलेेरुन नदीचा काठ आम्हा महाराष्ट्रातील पोरांना प्रेरणा देतो आहे...!
हजारो मैल अंतारावर कधी काळी उधळलेला
विजयाचा बेल भंडारा आम्हाला आमच्या पुर्वजांच्या अस्तित्वाची जाणिव करुन देत आहे...!
म्हणून म्हणतो की वाचलंच पाहिजे...!
कागदं बोलतात...!
______________________________________
इ.स.१६७७ जुलै ९
मार्टिन रोजनिशी
(मार्टिन हा पाँडेचेरी येथील फ्रेंच वखारीचा मुख्य आधिकारी होता.याने लिहलेली हकीकत सर जदुनाथ सरकार यांनी इस. १९२४ मध्ये प्रसिद्ध केली. त्यातील काही भाग.)
तेवनापट्टम किल्ल्यांतील लोक भिऊन पळाल्यामुळे तेवेनापट्टम(कुडालोर) किल्ला मराठ्यांनी घेतला.
पत्रसार संग्रह खंड-३
कागद क्रमांक-२७६७
______________________________________
इ.स.१६७७ ऑगस्ट २
नेलोररामाण्णा To ग लँघॉर्न(इंग्रज)
From place-
तंदुमगुर्ती
सि. डिगॉर आणि तेवेनापट्टणचा आधिकारी शिवाजीमहाराजांस भेटावयास आले.त्यांनी रेशमी कापड, चंदन, गुलाबपाणी, मालदिवी नारळ, लवंगा व तलवारीची पाती अशा वस्तूंचा नजारा केला.तो त्याने खुशीने स्विकारला व त्यांना तश्रीफा दिल्या.कित्येकांच्या मते शिवाजीने डचांना आमंत्रण केले आहे;असे आहे.तेवेनापट्टणच्या बाजूला डचांचा कांही माल लुटला गेला, त्याबद्दल भरपाई मागण्याकरितां ते आले होते.
शिवकालीन पत्रसार संग्रह खंड-२
कागद क्रमांक-१९६४
______________________________________
इ.स १६७७ ऑक्टोबर ३०
डाग रजि.शिवाजी महाराजांच्या गोंधळामुळे तेगनापट्टणच्या आसपास व्यापार बसला.शिवाजीमहाराजांकडून तेगनापट्टण हेंथे कंपनीच्या व्यापाराच्या बाबतींत अधिक सवलती मिळण्याची आशा व्यर्थ ठरली.
शिवकालीन पत्रसार संग्रह खंड-२
पत्र क्रमांक-१९९१
______________________________________
संकलन-
नवनाथ आहेर
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा