सातपुडा डोंगररांगेचे महात्म-नवनाथ आहेर
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
सातपुडा पर्वत रांगा
सह्याद्री व सातपुडा पर्वत हे एकमेकांशी काटकोनात आहेत.ते काही भिन्न व स्वतंत्र्य नाहीत हे आपण लक्षात घेतले पाहिजे.वरकरणी जरी ते भिन्न वाटत असले तरी त्यांचे अंतरंग हे एकच आहे.सातपुडा हा पर्वत अमरकंटकापासून ते तापी नदीच्या मुखापर्यंत पसरलेला आहे.सुमारे सहाशे मैल लांब व वीस ते शंभर मैल रुंद इतक्या मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे.महादेव व मैखल पर्वत हे सातपुड्याचेच वेगवेगळे भाग आहेत.यात महत्वाचे म्हणजे विन्ध्य पर्वतसुद्धा काही वेगळा नसून तो माळव्याच्या पठाराचाच एक भाग आहे.
तोरणमाळ व पचमढी ही अत्युच्च व विस्तिर्ण पठारे आहेत.पैकी तोरणमाळ हे पठार भव्य आहे त्याचा विस्तार आदमासे सोळा चौरस मैल इतका आहे.भोवताली तोरण्याची असंख्य झाडे असल्याने त्याला तोरणमाळ हे नामाभिधान आहे.तोरणमाळाच्या नेर्ऋत्येला एक विस्तिर्ण सरोवर आहे.मात्र हे कृत्रीम आहे धरणाचा बांधारा कुणी बांधला हे ज्ञात नाही.या तलावाचा परिघ पावणे दोन मैलांचा आहे.तलावाभोवती अनेक पडकी मंदिरे आहेत.स्थानिक माहीतीनुसार हि मंदिरे गोरक्षनाथांनी उभारलेली आहेत तसेच तेथे गोरक्षनाथांचेही प्रसिद्ध मंदिर आहे.
सातपुड्याच्या पश्चिम भागात गर्द आरण्ये आहेत.त्याचप्रमाणे पुर्व भागात गवताची कुरणे आहेत.
सातपुडा नावाच्या व्युत्पत्तीमागे अनेक कथा अढळतात पैकी एक दंतकथा आहे ती अशी की नर्मदा हि मेखलकन्या कारण मेखल पर्वतावर तिचा उगम झालेला आहे.तिच्या शक्तीपुढे सृष्टीचा निभाव लागेना म्हणून तिला आवरण्याचे कार्य हे महादेवाने
विन्ध्य व त्याचे सप्तपुत्र यांच्याकडे सोपविले.यांनी तिचा प्रवाह नियंत्रित केला व तेव्हापासून नर्मदा नदी हि मर्यादेने वाहू लागली.या सप्तपुत्रांच्या नावाहून सातपुडा हे नाव प्राप्त झाले असे मानन्यात येते तर काहींच्या मते एकामागे एक अशा सात रांगा असल्याने सातपुडा हे नाव प्राप्त झाले तर काहींच्या मते महाराष्ट्राचे आद्य राज्यकर्ते जे सातवाहन आहेत त्यांच्या कुळ नामाच्या संक्षेपाहून त्यांना सातपुडा हे नाव प्राप्त झाले.
आपण जर भूगर्भशास्त्राचा नकाशा निट अभ्यासला
त्यावरुन जर सह्याद्रीचा विस्तार आपण तपासला तर सह्याद्रीचा विस्तार व प्रदेशाच्या मर्यादा आपल्या लक्षात येतात.
*सह्याद्रीचा विस्तार-मालवणपासून खानापुरावरुन बेळगाव, तालीकोट, कलादगी वरुन वाडी;
मालखेड, कल्याणी,बेदर यांना सामाविष्ट करुन घऊन मुधोळ, हिंगणघाटावरुन नागपूर;
तेथून अमरकंटकवरुन जबलपूर पुढे सागर, चंदेरी, गुणावरुन निमच;
येथून प्रतापगड(गुजरात), झाबुवा व राजपिंपळा यावरुन दमणपर्यंत व अखेर दमणपासून समुद्राकाठाने मालवणपर्यंत यातीलच काही कणखर प्रदेशांत सातपुड्याचा समावेश होतो.म्हणून सातपुडा हा सह्याद्रीचाच एक भाग आहे असे म्हटल्यास त्याला हरकत नसावी.
_______सातपुडा डोंगर रांगेत नरनाळा, खांडारगड, चौगावचा किल्ला, पंचमढी, धूपगड, असिरगड, अमरकंटक, गाविलदड, जंबुद्वीप, चिखलदरा,तोरणमाळ इत्यादी किल्ले व महत्वाची ठिकाण आहेत.यातील धूपगड(1350mtr) व बैराट हि सातपुडा डोंगररांगेतील अत्युच्च शिखरे आहेत.बर्हाणपूर व खांडवा दरम्यान हि पर्वतश्रेणी काहीसी खंडीत झालेली आपल्याला आढळते याच ठिकाणाहून सांप्रदचा मुंबई ते आग्रा हा लोहमार्ग जातो.खांडवा व बर्हाणपूर हि दोन नगरे वगळता फार मोठ्या प्रमाणात मोठी शहरे या श्रेणीत नाहीत.
जे कार्य अजंठा डोंगररांगेचे होते तेच कार्य सातपुडा डोंगर रांगेचेही आहे. जे कार्य तेथील गडकोटांचे तेच कार्य या परिसरातील गडकोटांचेही आहे.
धन्यवाद..!
#सह्याद्री
नकाशा साभार-
प्राकृतिक भारत
नेटवरुन
संकलन-
नवनाथ आहेर
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा