शिवराय पुण्यतिथी-नवनाथ आहेर


३ मार्च १६७०

________रायरीच्या पर्वतावर छत्रपती शिवरायांनी अखेरचा श्वास घेतला.महाराज शरीराने अस्त पावले मात्र त्यांच्या विचारांचा वारसा ते आपल्याला एखाद्या संजिवनीप्रमाणे मागे सोडून गेले.उभी हयात खुद्द कळीकाळावर मात करत स्वराज्य निर्माण करत्यांस केवळ शब्दांत बांधणे हे सर्वात कठीण काम होय.किल्ले साल्हेर ते किल्ले जिंजीपावेत सबंध दुर्गांची शृंखला याची साक्ष देतेय ते सांगतायेत आपल्याला त्यांच्या पराक्रमाचे तेज..... ते ऐकण्यासाठी आपण तेथे गेले पाहिजेत.

'एकवीरा भगवतीं गणेशं च सरस्वती|सदगुरुं च महासिद्धं सिद्धानामपि सिद्धिदम् |
प्रणिपत्य प्रवक्ष्यामी महाराजस्थ धीमत:|
चरितं शिवराजस्य भरतस्येव भारतम् ||२२||
-भगवती एकवीरा गणपती सरस्वती आणि सिद्धांना सुद्धा सिद्धिदाता महासिद्ध सदगुरु यांना प्रणिपात भरतवंशाच्या भारताप्रमाण असलेल् बुद्धिमान शिवाजी महाराजांचे चरित्र मी कथन करतो.

       शिवभारतकार कविंद्र परमानंद शिवचरीत्राची सुरुवात करताना शिवरायांची तुलना हि भरताशी करतात.शिवभारत वाचत असताना कविने रचलेली कवने  डोक्यात मनात खोलवर रुजत जातात.कवी पुढे पुढे जसजसे शिवचरीत्र कथन करत जातो तस तसे आपल्याला शिवरायांच्या  प्रराक्रमाची, गुणांची, साहसाची प्रचिती यायला सुरुवात होते.कवी अगदी सर्व देवांची विशेषण महाराजांसाठी वापरतो हे खरच अद्वितीय आहे.याचप्रमाणे कवी भूषण देखील महाराजांची स्तुती करताना प्रचंड उदंड अशी विशेषणे महाराजांना देत जातो.यातून स्वराज्याला अभिप्रेत असणारे शिवराय आपल्या नजरसमोर उभे ठाकतात.म्हणून म्हणतो की नाही शब्दांत या तेजोमय सुर्याला बंदिस्त करणे शक्य होत नाही.
        किती विषय, किती गुण, कीती पराक्रम, कीती शौर्य, कीती साहस, कीती शिस्त हि अशी 'क' ची बाराखडी संपनेच अशक्य आहेत.स्वराज्याच्या तलवारीच्या पराक्रमात तर शिवराय आहेतच पण पराक्रमापलिकडचेही शिवराय आम्ही अभ्यासायला हवेत.नुसते अभ्यासून त्याचा फायदा नाही ते आम्ही कीती प्रमाणात आत्मसात करतोय, त्यातून कोणती प्रेरणा घेतोय हे महत्वाचे आहे.प्रेरणा अनेक प्रकारची असते प्रेरणा तर मोंगली बादशहांकडून त्यांच्या सैन्यालाही मिळायची मात्र ती एक तर पैशाच्या विलोभनाने वा मऱणाच्या भितीने... हि अशी प्रेरणा आम्हाला अपेक्षित नाही तर खर्या अर्थाने शिवचरित्राने पारायण करुन सह्याद्रीचे उदंड तिर्थाटन करुन मिळणारी स्वयं-प्रेरणा आपेक्षित आहे.
         मी तर नेहमी संकलनाच्या माध्यमातून शिवराय=सह्याद्री हे समीकरण मांडत असतो.त्याला कारणही हेच आहे की शिवराय व सह्याद्री हे दोन वेगवेगळे विषय आहेत असे मला वाटतच नाही.किल्ल्यांवर संवर्धन वा भटकंती करत असताना डोक्यात दोन गो़ष्टी असतात एक म्हणजे महाराजांनी सह्याद्रीचे महात्म जोखून पारखून आधीच्या इतिहासातून शिकत जाऊन हे दुर्ग उभारले त्यांच्या आश्रयाने स्वराज्य स्थापिले,रक्षिले, वाढविले व सह्याद्रीचे पुजन केल्याने जणू सह्याद्री साक्षात महाराजांना जणू प्रसन्नच झालेला आहे.
दुसरी म्हणजे शिवराय कधीही सह्याद्री सोडून राहिले नाहीत म्हणजे त्यांची चरणधूळ येथे आहे या सह्याद्रीत आहे येथे मी उभा आहे या किल्ल्यांवर आहे येथील पडक्या इमारतींच्या चिर्यांत ते आहेत ते आपल्याला नक्की पहात असतील.
खर तर त्यांची चरणधूळ मस्तकी लावावी इतके आमचे माथे उजळही नाहीत मात्र ते या चरधूळीने नक्की उजळ होतील हा एक विश्वास मनात आहे.विश्वास घात हा जरी मराठ्यांना शाप असला तरी या चरणधूळीवर मात्र प्रचंड विश्वास आहे आणि का नसावा? 
आम्ही आज इतक्या वर्षांनेही त्यांच्या विचारांनी प्रेरीत होत आहोत तर खुद्द शिवरायांच्या सान्निध्यात वावरणारे प्रत्येकजण हे प्रतिशिवरायच होते.प्रसंगी कटून पडले पण माघार घेतली नाही या मागे एक विश्वासच होता न म्हणूनच मलाही असाच विश्वास आहे.
______महाराजांनी हयातभर कृतीतून जगाला हे दाखवून दिले की राजा कसा असावा.आज राज्यकर्ते आमच्या लोकशाहीतही आहेत पण आपण बघतोच आहोत की काय काय प्रकार येथे होत असतात.आपण पुस्तकांतून वाचतो बघतो की येथे या सह्याद्रीत कितीएक आपलेच पुर्वज लढाई प्रसंगी आपले रक्त सांडते झाले त्याच सह्याद्रीचा लोक बाजार मांडतायेत याचा सरळ अर्थ होतो की तुम्ही तुमच्याच पुर्वजांच्या रक्ताशी बेईमान आहात.आज महाराजांच्या नावाचा वापर करुन कित्येक पक्ष व लोकं आपला स्वार्थ साधत आहेत हे बदलने खरे तर गरजेचे आहे.महाराजांनी जे जे म्हणून निर्माण केले,जे जे विचार आपल्याला दिले त्या विचारांतून प्रेरणा घेत आपले जिवन व्यथित करने व त्यांच्या प्रतिकांचे संगोपन पुजन करणे हिच खरी त्यांच्याप्रती असलेली निष्ठा आहे.हेच खरे अभिवादन आहे..! 


धन्यवाद..! 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संघर्ष-नवनाथ आहेर

शूर्पारक अष्टागर

नाणेघाट लेख-जयंत कुलकर्णी