किल्ल्यांवर माहीतीच्या पाट्या लावणे योग्य की अयोग्य?
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
किल्ल्यांवर नावाच्या व माहितीच्या पाट्या लावणे म्हणजे संवर्धन आहे का?
तर त्याच उत्तर आहे की नक्कीच नाही.
मग का लावतो आपण पाट्या आणि त्यावर आपल्या ग्रुपचे,संस्थेचे नाव?
हे परिपुर्ण संवर्धन जरी नसले तरी तो संवर्धनाचाच एक भाग आहे.तो कसा हे समजून घेऊ..! 😊
______किल्ल्यांवर नावाचे बोर्ड लावणे खुप गरजेची बाब आहे.कारण,सह्याद्रीत येणारा प्रत्येक जन काही परिपुर्ण अभ्यास करुन येत नसतो.सह्याद्रीत येणार्यांची प्रत्येकाची आपापली कारणे वेगवेगळी असतात.अगदी नेहमीचे भटके सुद्धा कधी कधी पायाखालील रस्ता असूनही रस्ता भटकल्याचे अनेक अनुभव पाठीशी व पाहिले आहेत.अशावेळी या दिशादर्शक फलकांचा खुप म्हणजे खुप उपयोग होतो.अगदीच म्हणाल तर हे फलक कधी कधी जिवदान देणारेही ठरतात.दुसरी गोष्ट म्हणजे किल्ल्यांवर ज्या वास्तू आहेत त्या वास्तू इतरांना समजायला मदत होते व सदर व्यक्तीचा वेळ वाचतो आणि आमुक एक वास्तू या ठिकाणी आहे असा माहीती फलक व वास्तूची माहिती असल्याने त्या वास्तूचे महत्वही समजते.फलक लावताना रंग नेहमी प्रकाशाने रिफ्लेक्ट होणारेच ठेवा.जसे लाल,पिवळा वगैरे.
________आता राहिली गोष्ट बोर्डवरील ग्रुप,संस्था आदिच्या नावाचा.
"तर,आपण कुठलीही गोष्ट करत असताना त्या गोष्टीचा इतरांना उपयोग होतोय हि भावना मन सुखावणारी व स्वत:ला प्रेरीत करणारी असते."
कुणी आपण संवर्धित करत असलेल्या किल्ल्यावर गेले न त्यांचा आपल्याला रिप्लाय आला की तुमच्या संस्थेने,ग्रुपने छान काम केलय त्याचा आम्हाला खुप उपयोग झाला.
हि गोष्ट मनाला खुप सुखावणारी असते.
_______आता महत्वाचा मुद्दा बा रायगड परिवाराने वरंधा घाटातील कावळ्यागडावर थोड्या आधिक प्रमाणात संवर्धनाचे काम केले आहे.म्हणजे नुसते बोर्ड लावण्याचे नाही तर पुर्वी वरंधा घाट नव्हता तेव्हा पठारावरुन त्या भागातून खाली जायला दोन नाळा होत्या व त्या खाली रामदास पठारावर उतरतात.त्या नाळांचा व आसमंताचा जो किल्ल्याचा टेहाळणीचा भाग होता त्या भागातील पाण्याचे टाके पुर्ण मातीत गेलेले ते पुर्ण साफ केले.यावर्षी ते खळाळून भरले व या भागात पिण्याच्या पाण्याची सोय झाली अशी आठवणीतील अनेक कामे आहेत.तर,याचाच एक भाग म्हणून परिवाराने वरंधा घाटातील डांबरी रस्त्यावर एक माहितीचा फलक लावला होता.त्याचा उद्देश इतकाच होता की लोकांना निदान समजावे की येथे एखादा किल्ला आहे.हा किल्ला संवर्धनाला घेण्याआधी मी हि कित्येकदा वरंधा घाटातून प्रवास केला पण कधी माहीत नव्हते की येथे किल्लाही आहे.हिच स्थिती अनेकांची होती.म्हणून हा माहिती फलक लावला होता.तो माहिती फलक काही महाभागांनी तोडून टाकला.हा नुसता फलकाचा अपमान नाही तर सदर किल्ल्याचा अपमान आहे आणि गडकोटांचा अपमान करणार्याचा खास समाचार महाराष्ट्रात घेतला जातो.
_____सांगायचे तात्पर्य इतकेच कि या माहिती फलकांना इतर लोक वाचत असतात.त्याने माहीती प्रसारणाचे उत्तम कार्य होते.त्याचा असा विपर्यास करने नक्कीच योग्य नाही.तुम्हाला असे कुणी करताना आढळले तर त्याला नक्कीच हि समज द्या..!
धन्यवाद..!
नवनाथ आहेर
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा