मध्ययुगीन भारत




______सुमारे दोन हजार वर्षापूर्वी आपल्या पुर्वजांनी उभारलेल्या बंदरांतून पुढे सुमारे दिड हजार वर्षापर्यंत हिंदुस्थानच्या समुद्रकिनारपट्टीवरचा व्यापार अव्याहतपणे चालला होता.पुढे महाराष्ट्राचे तुर्काण झाले;या राज्यक्रांतीचा परिणाम महाराष्ट्राच्या आर्थिक जीवनावरही झाला आणि महत्वाचे म्हणजे पठारावरील समृद्धीवर अवलंबून असलेली कोंकणांतील कितीएक बंदरे जी एकेकाळी प्रचंड प्रचंड वैभवशाली बंदरांत गणली जात होती ती गतवैभव झाली.जी काही थोडी फार उरली होती ती पोर्तुगिज,डच,इंग्रज व मोंगलांनी नष्ट केली त्यात निसर्गही कोपला व महाराष्ट्रात लगोपाठ तीन दुष्काळ पडले त्यामुळे उदरभरणासाठी येथील लोकही जागोजाग पांगले गेले या सर्व कारणांमुळे हि बंदरे इतकी उध्वस्त झाली की येथी बंदरांचे व जुन्या धडधाकट इमारतींचे अवशेषही सापडायला आता जागा नाही.शूर्पारक(नालासोपारा) व चौल येथील लोकसंख्या,संपन्नता व व्यापार या बाबत परदेशी प्रवाशांनी केलेली वर्णने पाहता आपल्या नक्कीच लक्षात येईल की येथील आताचे व पुर्वीचे वैभव.
_______भारताच्या राजकीय,आर्थिक व सांस्कृतिक इतिहासावर पश्चिम समुद्रकिनार्याने खुप महत्वाचे परिणाम घडवून आणले आहेत हे निर्विवाद सत्य आहे आणि महाराष्ट्रावरही.हिंदुस्थानचा पश्चिम किनारा कराचीपासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेला आहे.मौर्य पुर्व काळात हिंदुस्थानांत निर्माण होणारा कच्चा माल व पक्का माल मुख्यत्वेकरुन गांधार व अभिसार प्रांतातून खुष्कीच्या मार्गाने मध्य आशियांतून मेसापोटेमिया,मिसर व भूमध्य समुद्राभोवतालच्या देशांकडे रवाना होत असे;खि.पू. काळात आशियातील आखाती वाहतूक हि इराणी व मिसरी लोकांच्या हाती होती.या व्यापारामुळे हे देश संपन्न झाले.खि.पू. चवथ्या शतकाच्या अंतिम काळात अलेक्झँडरने मध्य आशियांतून पंजाबवर स्वारी केली हि स्वारी अलेक्झँडरने केवळ जगज्जेता म्हणून मिरविण्यासाठी नाही तर हिंदुस्थानच्या व्यापारावर ग्रीसचे प्रभुत्व प्रस्थापित करण्यासाठी केली होती आणि झालेही तसेच अलेक्झँडरच्या या दुरदृष्टी असलेल्या स्वारींचा ग्रीसला व ग्रीस रोमच्या ताब्यात गेल्यानंतर रोमला फायदा हा मिळालाच.सातवाहनांनंतरच्या कालखंडात महाराष्ट्रातील सत्तांनी या समुद्रकिनार्याचे महत्व जोखले व जपलेले दिसत नाही.चालुक्यांनी मौर्यावर घारापुरीच्या आरमारी युद्धात विजय मिळविला पण याचा अर्थ असा नव्हता की चालुक्यांचे समुद्रावर आधिपत्य होते...! पुढे कदम्ब व शिलाहार हे दक्षिण व उत्तर कोंकणाचे आधिपती झाले.त्यांच्याही पदरी आरमारे ही होतीच पण त्यांनी याचा उपयोग फारसा केल्याचे दिसत नाही.चालूक्य,राष्ट्रकुट व यादव या बहुतांशी मैदानी सत्ता होत्या त्यांच्या राजधान्याही बहुतांशी मैदानीच होत्या.परिणामी यांना स्वराज्याच्या लगत असलेल्या समुद्रावर फारसे लक्ष दिले नाही व समुद्री व्यापार व सत्ता या आरबांच्या हातात गेल्या.बहामनी घराणे जेव्हा दुर्बल झाले आणि लयाला गेले त्यावेळी इतर सत्ताही प्रबळ नव्हत्या याच कालखंडात पोर्तुगिजांनी गोव्यावर आपला कब्जा केला.अहमदनगरची निजामशाही जेव्हा संपुष्टात येत होती तेव्हा जंजिरा हा सिद्धींच्या ताब्यात गेला.मग काय........
दमण,वसई,रेवदंडा  व गोवा ही पोर्तुगिजांची ठाणी,मुंबई व सुरत हि इंग्रजांची ठाणी,सिद्धीचा राजधानी जंजिरा.त्याचप्रमाणे दक्षिण कोंकणात सह्याद्रीच्या अनेक शाखा घुसलेल्या आहेत त्यामुळे यांना आश्रयस्थाने मिळाली व केंद्रीय सत्ता या परस्पर संघर्षात गुंतल्याने इकडील कारभार हा पुर्णत: खुला होता.याचाच फायदा या आक्रमकांना मिळाला किंबहुना सांचे उच्चाटन करण्याचा अवसर मध्यवर्ता सत्तांना मिळाला नाही.
_______शूर्पारकात जसे सोपारा तसे अष्टगरांत चौल हे बंदर वैभवशाली होते.चौलचे प्राचीन नाव हे चंपावती होय या बाबत अनेक दंतकथा आहेत.चौलच्या शेजारीच रेवदंडा बंदर आहे.रेवदंड्याभोवतालच्या परिसराला रेवतीक्षेत्र अशी एक संद्ना आहे.रेवती ही बळरामाची पत्नी होय.कृष्णाने हा प्रदेश तिला आंदण म्हणून दिला होता अशीही एक कथा आहे.जुने प्रवाशी व बखरकार सांगतात की दुसर्या शतकांत चौल येथे सोळा लाख घरे,तीनशेसाठ देवळे व तेवढीच तळीं होती.यांपैकी ४४ देवळांची नावे पुराणांत दिली आहेत.यापैकी पाच देवळे आजही अस्तित्वात आहेत.पैका रामेश्वरमंदिर हे विशेष प्रसिद्ध आहे.खुद्द भगवान शंकरांनी तीन ठिकाणी लिंगस्थापना केला १)कन्याकुमारीजवळ रामेश्वर
२)गोकर्ण महाबळेश्वर
३)चंपावतीचे रामेश्वर मंदिर 
______सह्याद्रीत आपण बरेचसे जण भटकंती करत असतो.भटकंती करताना आपल्याला घाटवाटांवर अनेक लेण्या,कोरीव मंदिरे सापडतात.आपण पाहतो,न्याहाळतो पुढे जातो पण खरच जर यावर निटसा अभ्यास केला तर कुणाला तरी विचारावेसे वाटते.एखाद्या स्थापत्यकाराला विचारावेसे वाटते की कान्हेरी,घारापुरी(एलिफंटा) वगैरे आसमंतातील ठिकाणी ती जी अद्वितीय शिल्पकृत्ये आहेत ती निर्माण करण्यासाठी किती पिढ्यांना आपल्या शक्ती केंद्रीत कराव्या लागल्या असतील व त्यासाठी किती संपत्ती ओतावी लागली असेल?
एखाद्या शासनतद्नाला विचारावेसे वाटते की या भागात आहेत त्या शिल्पकृत्यांच्या पाठीशा असलेली राजकीय संघटना कीती उच्च दर्जाची असेल?
या भागांतील लेण्यांतील व मंदिरांतील वास्तु व लेखांतील स्थानांची नावे पाहून भूगोल व समाजशास्त्रद्नांना विचारा की ही संस्कृती नक्की कुणाची होती?
ही समृद्धी व संस्कृती,सामर्थ्य व संघटना महाराष्ट्राची,महाराष्ट्राचीच आणि याची आपण तुलना करायला हवी म्हणजे आपल्या लक्षात येईल महाराष्ट्रातील प्राचिन व मध्ययुगीन राज्ये हि कीती स्वतंत्र व समर्थ होती.

#मध्ययुगीन_भारत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संघर्ष-नवनाथ आहेर

शूर्पारक अष्टागर

नाणेघाट लेख-जयंत कुलकर्णी