शिवकालीन नाण्यांचे प्रकार


शिवकालीन नाण्यांचे प्रकार-

शिवकालीन, शिवकाळातील व आधीच्या नाण्यांचे प्रकार


1)अटका, अडका-सुपारी
2)अधेला-अर्धा पैसा
3)अधेली-अर्धा रुपया
4)अर्दी-एक पै
5)आगुदान-देवगिरीच्या यादवांचे सुवर्णाचे नाणे
6)आसु-देवगिरीच्या यादवांचे एक चांदिचे नाणे
7)उदानका-पैसा
8)अश्रफी, आशरफी-एक सुवर्ण नाणे
9)कपर्दक, कपर्दिका-कवडी
10)कलदार-इंग्रजी शिक्क्याचा सुरत येथील रुपया
11)कर्षापण-जुन्या काळातील एक नाणे
12)गबर-एक सोन्याचे नाणे
13)गिनी-इंग्लंडमधील एक सोन्याचे नाणे
14)गिन्नी-हिंदुस्थानातील एक आण किंमतीचे नाणे
15)घुला-पिवळसर रंगाची मोठी कवडी
16)चकार, चकारा, चकारी-चवला, दोन आण्याचे नाणे
17)चक्रम-दक्षिणेतील एक सुवर्ण नाणे
18)चवल, चवली-दोन आण्याचे नाणे
19)चाम-एक सुवर्ण नाणे
20)चाल-एक नाणे
21)चौवी-चवली
22)दुणेली-दोन आणे किमतीचे नाणे
33)छदाम-पैशाचा एक चतुर्थांश, दोन दमड्या, सहा दाम
24)टाक-चांदीचा रुपया
24)टाली-आठ आणे, अधेली
26)टोली-पैशाचा आठवा हिस्सा
27)तांग-सोळ पयांचे एक चलन
28)ताट-पुतळी, आजमासे पाच रुपये किमतीचे एक सुवर्ण नाणे
29)तांबली-तांब्याचे एक क्षुद्र नाणे
30)तिवल-दीड आणा
31)दुवल-एक आणा
32)दुवली-आणेली
33)तिरकी-एक पै, रुका
34)तुरु-एक प्रकारचे नाणे
35)दमडी-पैस्याचा चौथ्या हिस्स्याचे किंवा दहा बारा कवड्यांच्या किंमतीचे नाणे. 
36)दाभोळी लारी-दाभोळ बंदर टांकसाळीत पाडलेले आदीलशाही नाणे, याचा आकार स्रियांच्या हेअुपिन सदृश होता. 
37)दाम-तांब्याचे नाणे
38)दिडकी-एक पैसा, दिड दुगाणी नाणे
39)दिनार-एक नाणे
40)दिरम, दिरिम-दोन आणे किंमतीचे चांदीचे नाणे
41)दुकंडा-दोन कवड्यांचे चलन
42)दुगाणी-अर्धा पैसा
43)दुदांडी-दोन समांतर रेष असलेली पेशवाही शिवराई
44)दुकार-एक आणा
45)दुडु, दुडू-पैसा हे तांब्याचे नाणे, पैस्याच्या एक चतुर्थांश किमतीचे नाणे
46)दुवल-रुपयाचा सोळावा भाग
47)दुवली-आणेली
48)दोकडा-गुजरातमधील नाणे परिमाण
49)धरण-समुच्चयाने नऊ आणे, पाव होन
50)नासरी-अर्धी दमडी
51)निमती-अधेली आणे
52)निष्क-एक सोन्याचे नाणे, चार रुपये किंमतीचे एक परिणाम 
53)पचकी-दमडीच्या किंमतीचे एक नाणे 
54)पताक-एक रुपयाचे नाणे 
55)पाई-पै
56)पार्दाव-पोर्तुगिज नाणे
57)पागोडा-मद्रासकडील सोन्याचे नाणे
58)पाची-पाच रुपये किमतीचे सोन्याचे नाणे
59)पावणा-पाव आणा, पैसा
60)पावली-रुपयाचा एक चतुर्थांश, चार आणे किमतीचे नाणे 
61)पै- आण्याचा बारावा ़भाग
62)पैसा-आण्याचा चौ़था भाग, तांब्याचे एक नाणे
63)पोवन-सावरीन नावाचे सोन्याचे नाणे
64)फद्या-फार्दिंग नावाच्या इंग्रजी तांब्याच्या नाण्याचा अपभ्रंशाने उच्चार. 
65)फनम-दक्षिणेकडील चांदी किंव्वा सोने याचे एक लहान नाणे
66)फसकी-फसा असलेली पुतळी
67)फाटा,फांटा-रुपयाचा सोळावा भाग, आणा
68)बेल-आर्धा आणा
69)बोडी-वीस कवड्यांचे एक नाणे
70)ब्याळ-अर्धा आणा
71)मुयेद-अठ्ठावीस रुपये किमतीचे नाणे
72)मोहर-सोन्याचे एक तोळा वजनाचे नाणे
73)म्वार-मोहर
74)रयाल-एक चांदीचे नाणे
75)रुका, रुक्का-आण्याचा बारावा भाग, पै
76)रुपया-सोळा आणे किंमतीचे चांदीचे नाणे
77)रुब-चार पै, फद्या, फार्दिंग
78)रुबल-रुस देशातील दिड रुपया किमतीचे एक नाणे
79)रेवती-अधेली,अर्धा रुपया
80)रेस-आण्याचा २५ वा भाग व रुपयाचा ४०० वा भाग, एक पोर्तुगीज नाणे 
81)लोही-मोहर, सोन्याचे नाणे
82)शाई पैसा-शाही पैसा मुसलमान शहाचे नाणे
83)शिवराई-शिवरायांनी पाडलेली सोन्याची व तांब्याची नाणी
84)शिवाई-शिवरायी होन
85)मोहर-सावकाराने पाडलेली मोहर
86)शेणी-दुंडा,ढबू पैसा
87)सणी-सजगणी, ढबू पैसे
88)सन्या-अर्धा आणा
89)सप्तगणी, सप्तगाणी-ढबू पैसा
90)सकरीन-आठ आणे किमतीचे नाणे
91)ससगणी, ससगाणी-सजगणी, दुंडा पैसा
92)सापिका-दीड रुका किमतीचे तांब्याचे नाणे
93)स्पुलिंग, स्फुल्लिंग-एक आण्याचा 1/156 किंवा शिवराई तिरुका याचा १/६४ व२ भाग
94)होन-सोन्याचे साधारण ३ एक छेद दोन किमताचे नाणे
95)अलमगिरी-औरंगजेबाचे चलन
96)अलिबागी-आंग्रे यांचा रुपया
97)अश्रफी-एक सोन्याचे नाणे,मोहर, झेराफिन या 98)पोर्तुगीज शब्दाचा अपभ्रंश
99)अहमदी-टिपुचा सोन्याचा होन
100)इभ्रामी-इब्राहिम आदिलशहाचा होन
101)एकेरी-दक्षिणेकडील होन
102)कची-ठेली-तुटका पुसट किंवा तडा गेलेला रुपया
103)कंठी रुपया-निळकंठी रुपया
104)कलेकरी-कलदार रुपया
105)कामील- एक होन प्रकार
106)कावेरीपाक-एक होन प्रकार
107)खुर्दा-मोड
108)खुळा पैसा-दक्षिणेकडील तांब्याचे नाणे, ७००=१ रुपया
109)गंजीकोट-गंजीकोट येथील चलन
110)गंभार, गंभर-एक सोन्याचे नाणे
111)चतरसिंगी रुपया-पुणे येथील चतुशृंगी रुपया
112)चांदवडी-चांदवड येथील रुपया
113)अटीचा रुपया-आटविण्यास योग्य खराब झालेला रुपया
114)अदवानी-होन प्रकार
115)इटावप्रत-इटावा ये़थील रुपया 
116)जडमोल-होन प्रकार
117)जमसिरी, जमसेरी, जमखंडी-होन प्रकार
118)जहाजाना पंचमेळ रुपये-रुपयांचा प्रकार
119)जुनथर-जुने चलनांतील नाणे
120)जुल्फकारी, झुल्फकारी-हैद्राबादचा रुपया यावर तरवार चिन्ह आहे
121)जैफ-पुसट गुळगुळीत झालेली किंवा कातरलेली नाणी, ही सरकारी पोत्यांस किंवा सरकारात भरण्यास अयोग्य. 

साभार-
हुजूरबाजार
श्री. आप्पा परब

संकलन-
नवनाथ आहेर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संघर्ष-नवनाथ आहेर

शूर्पारक अष्टागर

नाणेघाट लेख-जयंत कुलकर्णी