वडगाव मावळ लढाई-नवनाथ आहेर


५ते ६ फेब्रुवारी १६६४ 
_______६ जानेवारी – ९ जानेवारी १६६४ पर्यंत महाराजांनी मनसोक्त सूरत लुटली.मराठे-मराठे सुसाट सुटले
शहेनशा ए हिंदोस्थांची सुरत बदसुरत झाली. सुरतेची धनलक्ष्मी घेउन मराठे थेट लोहगडावर पोचले. शहाजी राजांच्या मृत्युची बातमी कळताच महाराज राजगडी निघून गेले.
लुटीचा माघ काढीत मोघली हेर लोहगडाच्या आसमंतात पोचले आणि तडक मागे जुन्नरहुन मुकुंदसिंह लोहगडाच्या दिशेने निघाला. मुकुंदसिंहांस अटकाव करण्यासाठी महाराजांचा बाळसवंगडी नारों बापूजी मुदगल सरसावला. नारो बापूजी हे बापूजी श्रीपत मुदगल नर्हेंकर देशपांडे यांचे पुत्र.
______वडगावजवळ नारो बापुजिंच्या आणि मुकुंदसिंहाच्या सैन्याचा सामना झाला. मुघलांनकडे अनेक घोड़ेस्वार, तीरंदाज, आणि बंदूकधारी सैनिक होते. तरी सुद्धा मराठ्यांच्या युद्धतंत्रा समोर मुघलांचा निभाव लागत नव्हता. नारो बापूजी आपली नागवी समशेर नाचवित मोघलांनवर असे काही तुटून पडले होते की, मुघलांची त्रेधातिरपिट उडाली. या वीराला कसा थोपवावा हेच मुकुंदसिंहास कळत नव्हते. शेवटी मुघली तिरंदाजाने सोडलेला तिर नारो बापुजिंच्या छातीत घुसला आणि ते धरणीवर कोसळले.....

____इ.स.१६६४.तिनही जुमले लोहोगडीहून नेतोजीच्या सरनोबतीचे वेळेस सुरतेहून आलियावर लोहगडी लष्कर राहीले.तो वडगांवजवळ वडाखाले मुकुंदसिंह रजपूत होता त्यांसी गांठ पडली.ते वेऴेस चिमणाजी पुढे लुटीस गेला.नारो बापूजीस तीर थनतरीस लागला.तो घोडा गजरत्न आसनको होता,त्यावरी जीव गेला.
(शिवकालीन पत्रसार संग्रह प.क्र-२५९०)
______प्रणाम स्वराज्य निष्ठेला......
______स्वराज्य रक्षणार्थ झुंजत्या झालेल्या ज्ञात अज्ञात वीरांना त्रिवार अभिवादन.....
#वडगाव_मावळ
-नवनाथ आहेर 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संघर्ष-नवनाथ आहेर

शूर्पारक अष्टागर

नाणेघाट लेख-जयंत कुलकर्णी