घोसाळगड व मांदाड खाडी-नवनाथ आहेर
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
_____ताम्हिणी घाटाच्या कुशित उगम पावलेली कुंडलिका नदी ही पुढे साळावच्या खाडीला मिळते म्हणजे रेवदांडा व चौल परिसरात.कुंडलिका नदीच्या उगमापासून अनुक्रमे सुधागड, सरसगड, सूरगड,अवचितगड,बिरवाडीचा किल्ला,पुढे समुद्राच्या तोंडाला डाव्या बाजूला कोर्लाई व उजव्या बाजूला रेवदांडा हे किल्ले आहेत.
त्याच प्रमाणे मांदाड या खाडीवर किल्ले तळगड,किल्ले घोसाळगड हे किल्ले आहेत.
______अगदी फार फार मागे गेलो तर हा संपुर्ण समुद्रकिनारा हा पोर्तुगिजांच्या ताब्यात होता.त्याच्यानंतर हा परिसर जंजिर्याच्या संरक्षणामुळे हबसिंच्या ताब्यात गेला.अबेसिनियातील हे सिद्धी किती पसरले?
माझ्या माहितीप्रमाणे यांच्या राज्याची सिमा रायरी पर्यंत होती.श्रीवर्धनसारखे तगडे परिसर यांनी आपल्या ताब्यात ठेवले होते.याच हबसी सिद्धींच्या ताब्यात होते.मराठी साधनांमध्ये पुढिल प्रकारे नोंदी मिळतात.
१६५७-
" महाराज पुरंधरास आले.तेथें(कोंकणांत) सोंढवळकर कोटवळकर उभयतां मर्हाठे थोर माणूस होते.त्यांणी लेहून पाठविले कीं,तळा व घोसाळा किल्ले दोन,शामळाकडे आहे.त्याचे प्रांती आम्हास राहणें.वृत्तीवंत आहों.अनेक प्रकारें उपद्रव देतो.तूं राजा धर्मस्थापक आहेस.तरी इकडे स्वारी आलीं असता दोन जागा अनकूळ होऊन देऊं.ह्या योंगे बहुत प्रांत साधेल.आम्ही ह्या अर्थे पदरांत येऊं,तें श्रवणी पडतांच नेकदार मनुष्य चांगले,अलीं तारीफ केली आणि स्वारी पाठविली.मागाहून खासा स्वारी(शिवाजीराजे)गेली.पुढे लोकांनी तळा किल्ला घेतला."
-मल्हार रामराव चिटणिस बखर
_________________________________________
१६५७-
"तळा-घोसाळा सोंढवळकर व कोंढवळकर ,हपसियाचे चाकर,मर्द जमातदार होते.त्यांचे राजकारण महाराजांकडे आले.आपली स्वारी कोंकणांत यावी,म्हणजे तळा -घोसाळा घेऊन देतो व जंजिरियांचेहि राजकारण आलें.ह्यांजवरुन खासा स्वारी कोंकणांत जाऊन दोन किल्ले तळा -घोसाळा घेतला."
-मल्हार रामराव चिटणिस बखर
_______सोंढवळकर व कोंढवळकर यांनीच राजकारण लावून हे किल्ले स्वराज्यात सामिल केले.फोटोत हि तोफ दिसतेय ती इंग्रज वा पोर्तुगिज बनावटीची आहे.पण हि तोफ किल्ला स्वराज्यात येण्याच्या आधिच येथे असावी असा माझा अंदाज आहे.असो हा तर्काचा विषय आहे.पण...
"मांदाडच्या खाडीचे तळा व घोसाळा हे दोन रक्षक किल्ले होते.या तोफेचा दरारा समुद्री सत्तांना माहित होता.आजतागत हि भरभक्कम तोफ त्या मांदाडच्या खाडीवर लक्ष ठेवून आहे."
फोटो-घोसाळगडावरील तोफ व समोर दिसणारी मांदाडची खाडी...!
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा