सह्याद्री


"अलेक्झँडर व सायरस यांनी अनुक्रमे ग्रीस व इराण यांच्या सुप्त शक्ती जागृत केल्या.चंद्रगुप्त मौर्य व सम्राट अशोक यांच्या राजवटीत साधलेले हिंदुस्थानचे ऐक्य हि अलेक्झँडरच्या स्वारीची प्रतिक्रियाच होय की...चंगीजखानाने मंगोलियांत चैतन्य निर्माण करुन दोन खंडे पदाक्रांत केली अशी अनेक उदाहरणे जगाच्या पाठीवर बोलकी आहेत.जोपर्यंत एखादा महापुरुष जन्माला येत नाही तोपर्यंत या पठारी वा डोंगरी भागांतील जमातींच्या(येथे वेगळ्या अर्थाने) शक्ती या सुप्तावस्तेत असतात.वरील दोन उदाहरणांतील एक अलेक्झँडर व दुसरा चंगीजखान यांच्या विचाराने प्रेरणा घेत त्यांच्या अनुयायांनी स्वत:तील संघभावना व सुप्त शक्तीला जागृत केले.
पण मित्र हो,

"अकस्मात सचेतन झालेल्या शक्तीचा प्राथमिक अविष्कार हा नेहमी विध्वंसकच असतो...!"

हे नेहमी आपण लक्षात घेतले पाहिजे.

_____मात्र इथे महाराष्ट्रात याच्या नेमके उलटे घडले.येथे शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरणा घेऊन स्वत:तील सुप्त शक्ती जागृत झाल्यावर जी प्रकिया घडली ती समाजहिताची ठरली त्याला कारण होते योग्य नेतृत्व.शिवरायांच्या विचारांचे महात्म्य अलौकीक आहे हि भावना लोकांच्या मनात निर्माण झाली आणि म्हणूनच लोकांनी शिवरायांच्या नेतृत्वाला तनामनातून मान्यता दिली.एका अगाद दुरदृष्टी व पराक्रमी नेतृत्वाखाली एकवटल्याने सर्वत्र फक्त न फक्त विजयश्रीच आपल्या पदरी पडली.मावळ मातीच्या माणसांतील वृत्तीला पोषक व अनुकूल असे कार्यक्षेत्र महाराजांनी उपलब्ध करुन दिले.म्हणूनच तर घरंदाज घराण्यातील नव्हे तर सामान्यातील सामान्य जनता झुंजती झाली.महाराष्ट्राला जो यादवीचा शाप होता त्यातून महाराष्ट्राला महाराजांनी मुक्त केलें व स्वातंत्र्योन्मुख केले.

"शिवरायांनी महाराष्ट्राची राजकीय उंची वाढविली,यांची प्रतिके कोण आहेत?
सरळ न सोप्प उत्तर आहे सह्याद्री न हे गडकोट.
न हेच या गडकोटांचे महात्म्य आहे...!"


#सह्याद्री

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संघर्ष-नवनाथ आहेर

शूर्पारक अष्टागर

नाणेघाट लेख-जयंत कुलकर्णी